पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तान अक्षरश: पेटला आहे. इम्रान खान यांचे समर्थक पाकिस्तान तारिक-ए-इन्साफ या पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन जाळपोळ, तोडफोळ आणि हिंसाचार करत आहेत. पाकिस्तानात एक प्रकारे गृहयुद्ध पेटले आहे. गोळीबारात पीटीआयच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. येवढ सगळं घडत असताना पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या समर्थकांकडून अजब-गजब दावा करण्यात आला आहे. तो ऐकूण तुम्ही सुद्धा आवाक व्हाल. आरएसएस आणि भाजपने भारतातून पाठवलेले लोक पाकिस्तानात तोडफोड आणि जाळपोळ करत आहेत, असा दावा पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे विशेष सहाय्यक अत्ता तरार यांनी केला आहे. (Imran Khan Arrest)
इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरुन लष्कर प्रमुखांच्या घरावर हल्लाबोल बोल केला. या घटनेनंतर बुधवारी पत्रकारांशी बोलताना अत्ता तरार म्हणाले, जे तोडफोड आणि जाळपोळ करत आहेत ते भारतातून पाठवलेले आरएसएस आणि भाजपने पाठवलेले लोक आहेत. (Imran Khan Arrest)
पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे सहाय्यक अत्ता तरार पुढे म्हणाले, हे जे मूठभर लोक दंगल घडवत आहेत ते भाजप आणि आरएसएसशी संबधित आहे. कालच्या घटनेनंतर भारतात आनंदोत्सव करण्यात आला. भाजप आणि आरएसएसने आनंदोत्सव साजरा केला आणि भारतात मिठाई सुद्धा वाटण्यात आली असा दावा त्यांनी केली. तसेच 'कल जो कुछ हुआ, वो आरएसएस के कहने पे हुआ (काल से काही झाले ते आरएसएसच्या आदेशानुसार झाले) असे सुद्धा तरार म्हणाले.
इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक चांगलेच भडकले आहेत. अटकेच्या निषेधार्थ क्वेटा येथे काढण्यात आलेल्या रॅलीत गोळीबार झाला. त्यात पीटीआय पक्षाचा एक कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. तर अन्य ६ जण जखमी झाले. इम्रान खान यांच्या समर्थकांनी मुख्य क्वेटा विमानतळ रस्ता रोखून धरला. अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने सुरू आहेत. रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयावर, पेशावरमधील फ्रंटिअर कॉर्प्सच्या मुख्यालयावर तसेच पाक गुप्तचर संघटना 'आयएसआय'च्या मुख्यालयावरही इम्रान खान समर्थकांनी हल्लाबोल केला. 'आयएसआय'च्या परिसरात जाळपोळ केली.
अधिक वाचा :