Latest

‘Anti Hindu HDFC’चा ट्रेंड : जाहिरातीत टिकलीचा चुकीचा वापर, नेटिझन्स भडकले 

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन : एचडीएफसी बँक त्यांच्या नव्या जाहिरात कॅम्पेनमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. आर्थिक फसवणुकीसंदर्भात जागरूकता पसरवणाऱ्या या जाहिराती 'विजिल आंटी' म्हणून दाखवलेल्या महिलेने लावलेल्या बिंदीचा वापर स्टॉप चिन्हासारखा केला गेला आहे. त्यामुळे या जाहिरातेवर नेटीझन्स चांगलेच उखडले असून या जाहिरातीचा उल्लेख त्यांनी हिंदू विरोधी (anti hindu) असा केला. 2022 मध्ये विजिल आंटी या संकल्पनेच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीसंदर्भात जनजागृती केली गेली आहे. अभिनेत्री अनुराधा मेननला या कॅम्पेनसाठी विजिल आंटीच्या रूपात दाखवल गेल आहे. या मोहिमेद्वारे सुरक्षित बँकिंग साठी प्रोत्साहन दिलं गेलं तसेच सायबर फसवणूक होऊ नये याबाबत काळजी घेणे यासाठी या कॅम्पेनची सुरुवात केली गेली.

पण आता मात्र ही जाहिरात नेटिझन्सच्या रडारवर आहे. Kreately Media ने याबाबत पोस्ट करत विचारले आहे की, "स्त्रीच्या कपाळावरील टिकलीला स्टॉप मार्कच्या रूपात दाखवून तुम्ही कोणत्या पद्धतीने हिंदू संस्कृती सादर करू इच्छित आहात ? तुम्हाला सांस्कृतिक अंधत्व आलं आहे का? तुम्ही जगातील चौथी मोठी बँक आहात. भारताचे अचूक प्रतिनिधित्व करण्याची मोठी जबाबदारी पार पाडता. कृपया हे मागे घ्या."

आणखी एक महिला युजरने ही अॅड मागे घेऊन माफी न मागितल्यास बँकेला बॉयकॉट करण्याबाबत लिहिलं आहे. तर एकाने ही बँकच हिंदूविरोधी असून हिच्यावर पूर्णपणे बहिष्कार घालण्याची वेळ आली असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने "अरे निर्लज्ज एचडीएफसी बँक हे काय आहे? तुम्ही हिंदू स्त्रियांची अशी थट्टा कशी करू शकता. तुम्ही लोक इतके गर्विष्ठ आहात की तुम्ही हिंदू स्त्रियांची आणि पवित्र बिंदीची चेष्टा कराल. देवाचे आभार मानतो माझे एचडीएफसी बँकेत खाते नाही." अशा शब्दात बँकेची निरभत्सना केली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT