Latest

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री- गृहमंत्र्यांमध्ये महत्त्वाची बैठक

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्था यावर चर्चा सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ३ मेचा अल्टीमेटम राज्य सरकारला दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच तणावपूर्ण परिस्थिती व संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर उभयतांमध्ये चर्चा सुरू असल्याचे समजते. सामाजिक सलोखा, शांतता आबाधित राखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरच्या भोंग्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार टीका होताना दिसत आहेत. या भोंगा प्रकरणावरून शिवसेना संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ईडीच्या कारवाईमुळे राज ठाकरे यांचा भोंगा सुरु झाला आहे. भाजपने त्यांना अभय दिले आहे, त्यानंतर त्यांचा भोंगा सुरु झाला आहे अशी टीका त्यांनी केली होती.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT