Latest

आय आय टी मुंबई आणि रिलायन्स जिओ आणणार देशी चॅट GPT ; वाचा सविस्तर

अमृता चौगुले

पुढारी डिजिटल : रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रानंतर आता चॅट जीपीटी क्षेत्राकडे मोर्चा वळवला आहे. आय आय टी मुंबई आणि रिलायन्स जिओ संयुक्त विद्यमाने आता देशी चॅट जीपीटी आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारत जीपीटी असे या जीपीटीचे नाव असेल.  रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी या कार्यक्रमाबाबत सुतोवाच केलं. त्यांनी घोषित केलेल्या या कार्यक्रमामुळे देशातील विविध क्षेत्रांमध्ये तसेच विविध भाषेतील मॉडेल्स जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (GPT) चा लाभ घेणं शक्य होणार आहे. जिओच्या या बॉर्डर व्हीजनला जिओ 2.0 असे नाव दिले गेले आहे.

आय आय टी मुंबईशी संलग्न असलेल्या या कार्यक्रमामुळे उत्पादन आणि सेवा यामधील अचूकता आणि कल्पकता वाढविण्यास आर्टिफिशल इंटेलिजन्सची मदत घेतली जाऊ शकते. आपल्या घोषणेत बोलताना आकाश अंबानी म्हणतात केवळ विशिष्ट संस्थेमध्येच नव्हे तर सर्व क्षेत्रांमध्यआर्टिफिशल इंटेलिजन्स याचे महत्त्व येत्या दशकात जास्त अधोरेखित होईल. पुढील दशकाची व्याख्या भाषा मॉडेल्स आणि जनरेटिव्ह एआय वापरणाऱ्या ऍप्लिकेशन्सद्वारे केली जाईल. भारत GPT शिवाय रिलायन्स जिओ टेलिव्हिजनसाठी स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम (OS) विकसित करण्यावर काम करत आहे. Jio च्या उपकरणांची क्षमता अधिक वाढवण्यासाठी तसेच सेवांच्या दर्जात वाढ करण्यासाठी ही ऑपरेटिंग सिस्टिम काम करेल.

माध्यमे, कॉमर्स, दळणवळण आणि उपकरणे यासारख्या विविध डोमेनमध्ये नवीन उत्पादने आणि सेवा देण्यासाठी कंपनी वचनबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवाय, आकाश अंबानी यांनी भविष्याला आकार देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व अधोरेखित केले. AI उत्पादने आणि सेवांच्या प्रत्येक पैलूमध्ये प्रवेश करेल हे देखील त्यांनी आवर्जून सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT