Latest

NIRF Rankings 2023: देशातील अभियांत्रिकी संस्थांच्या टॉप १० यादीत आयआयटी मद्रास अव्वल

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क: देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्था म्हणून IIT मद्रासने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजला देशातील सर्वोत्कृष्ट कॉलेज म्हणून मानांकन मिळाले आहे. शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी आज (दि.५) राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) रँकिंग 2023 ची यादी  (NIRF Rankings 2023) जाहीर केली. रँकिंगची यादी http://nirfindia.org.  या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल.

भारतातील टॉप 10 अभियांत्रिकी संस्था खालीलप्रमाणे –

इडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी

भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटी

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली

दरम्यान,  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर देशातील सर्वोच्च विद्यापीठात प्रथम क्रमांकावर आहे. तर अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास अव्वल आहे. त्याच वेळी, मिरांडा हाऊस या वर्षीही टॉप कॉलेजच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. NIRF रँकिंगची सुरुवात 2016 मध्ये झाली आणि ही त्याची 8वी आवृत्ती आहे. जेथे 2016 मध्ये 3500 संस्थांनी रँकिंगमध्ये भाग घेतला होता. त्याच वेळी, यावर्षी 8,686 संस्थांनी क्रमवारीत सहभाग घेतला आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT