Latest

ICC T20 Rankings : टी-20 क्रमवारीत ईशान किशन, दीपक हुडाची हनुमान उडी!

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला ताज्या आयसीसी टी 20 (ICC T20) क्रमवारीत फायदा झाला आहे. इशान इशान 10 स्थानांनी झेप घेत 23 व्या स्थानावर पोहोचला आहे, तर श्रीलंकेविरुद्धच्या वर्षातील पहिल्याच सामन्यात 23 चेंडूत 41 धावा करणारा दीपक हुडा देखील टॉप 100 मध्ये सामील झाला आहे. त्याने 40 स्थानांची झेप घेत 97 वे स्थान पटकावले आहे. (ICC T20 Rankings)

इशानने पहिल्या टी 20 सामन्यात 37 धावा केल्या होत्या. गेल्या वर्षी नंबर वन ठरलेला सूर्यकुमार यादव श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात अपयशी ठरला होता. मात्र, त्याला नुकसान झालेले नाही. तो पहिल्या क्रमांकावर कायम आहे. वानखेडेवर सूर्याने केवळ 7 धावा केल्या होत्या. सूर्याशिवाय टॉप 10 मध्ये एकही भारतीय फलंदाज नाही.

गोलंदाजांमध्ये भारताचा नवा टी-20 कर्णधार हार्दिक पांड्या 9 स्थानांची झेप घेत 76 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. सामन्यात श्रीलंकेसाठी अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या वानिंदू हसरंगा याने आपले अव्वल स्थान आणखी मजबूत केले. तसेच त्याने भारताविरुद्ध 21 धावा केल्या. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत अपयशी ठरल्यानंतरही मार्नस लॅबुशेनने फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. तथापि, रँकिंग यादीतील त्याचे सहकारी स्टीव्ह स्मिथ, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन यांना आपले गुण वाढवण्यात यश आले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत द्विशतक झळकावणाऱ्या विल्यमसनने दोन स्थानांची सुधारणा करत क्रमवारीत पाचवे स्थान गाठले आहे. गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आणि इंग्लंडचा जेम्स अँडरसन अनुक्रमे पहिल्या आणि दुस-या स्थानी कायम आहेत.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT