Latest

ICC Slams Indore Pitch : इंदोरच्या होळकर मैदानावरील खेळपट्टीवर एक वर्षाची बंदी?

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : होळकर मैदानातील खेळपट्टीला मॅच रेफ्रींनी खराब ठरवले असून याबाबतचा अहवाल आयसीसीला सादर केला आहे. मॅच रिपोर्टमध्ये होळकर स्टेडियमवरील कसोटी खेळपट्टीला तीन डिमेरिट पॉइंट दिल्याचे समोर आले आहेत. या अहवालाविरोधात अपील करण्यासाठी बीसीसीआयला १४ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. (ICC Slams Indore Pitch)

इंदोर कसोटीच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारताच्या सात विकेट पडल्या तर एकूण दोन दिवसांच्या खेळात ३० फलंदाज तंबूत परतले. अखेर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या तासाच्या खेळातच ऑस्ट्रेलियाने ७६ धावांचे लक्ष्य एक गडी गमावून सहज गाठले आणि सामना खिशात टाकला. सहा वर्षांनंतर कांगारूंना भारतीय संघाचा घरच्या मैदानावर पराभव केला आहे. या मालिकेत टीम इंडिया अजूनही २-१ ने पुढे आहे. (ICC Slams Indore Pitch)

इंदोरच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवसापासून फिरकीपटूंना मदत (ICC Slams Indore Pitch)

ICC खेळपट्टी आणि आऊटफिल्ड मॉनिटरिंग प्रक्रियेअंतर्गत इंदोर येथील खेळपट्टीला खराब दर्जाचे रेटींग सामना अधिकाऱ्यांकडून मिळाले आहे. दोन्ही संघांच्या फिरकीपटूंना पहिल्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच फिरकीसाठी अनुकूल खेळपट्टीमुळे खूप मदत झाली. पहिल्या दिवशी १४ पैकी १३ विकेट फिरकीपटूंनी घेतल्या. संपूर्ण सामन्यात पडलेल्या ३१ पैकी २६ विकेट फिरकीपटूंनी घेतल्या, तर फक्त चार विकेट वेगवान गोलंदाजांच्या हाती गेल्या. एक फलंदाज धावबाद झाला.

आयसीसी या पाच मैदानांवर खेळपट्ट्यांचे रेटींग करते

  • खुप छान (Very Good)
  • चांगले (Good)
  • सरासरी (Average)
  • सरासरीपेक्षा कमी (Below Average)
  • खराब (Poor)
  • अयोग्य (Unfit)

सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड काय म्हणाले ?

खेळपट्टीवर बोलताना सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड म्हणाले – खेळपट्टी खूप कोरडी होती. तिला बॅट आणि बॉलमध्ये संतुलन राखता आले नाही. खेळपट्टीवर सुरुवातीपासूनच फिरकीपटूंचे वर्चस्व होते. तसेच, होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीवर सीमची फारशी हालचाल नव्हती. संपूर्ण सामन्यात जास्त आणि असमान उसळी होती.

इंदोर स्टेडियमवर निलंबनाची धमकी

ICC खेळपट्टी आणि आउटफिल्ड निरीक्षण प्रक्रियेनुसार, जर एखाद्या खेळपट्टीला पाच वर्षांच्या रोलिंग कालावधीत पाच किंवा त्याहून अधिक डिमेरिट पॉइंट्स मिळाले, तर ती १२ महिन्यांच्या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयोजन करण्यापासून निलंबित केली जाते. अशा स्थितीत होळकर स्टेडियमला ​​तीन डिमेरिट गुण मिळाले आहेत. भविष्यात अशा खेळपट्ट्यांबाबत काळजी घ्यावी लागेल.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT