Latest

ड्रग्ज प्रकरणाचा पर्दाफाश केल्यामुळेच मला टार्गेट केलं जातंय : समीर वानखेडे

स्वालिया न. शिकलगार

ड्रग्ज प्रकरणाचा पर्दाफाश केल्यामुळेच मला टार्गेट केलं जातंय. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. मी कोणतीही चूक केलेली नाही. मला आणि कुटुंबीयांना टार्गेट केलं जातंय, असे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी न्‍यायमूर्ती व्‍ही. बी. पाटील याच्‍या न्‍यायालयात आज सांगितले.

ड्रग्‍ज प्रकरणाचा पर्दाफाश केल्‍यानेच माझ्‍यासह व माझ्‍या कुटुंबीयांना टार्गेट केले जात आहे. कारवाईची खोटी ठरविण्‍याचा हा प्रयत्‍न आहे. मी माझ्‍या आजवरच्‍या कारर्किदीत नेहमी योग्‍य पुराव्‍याच्‍या आधारेच कारवाई केली आहे, असेही वानखेडे यांनी प्रतिज्ञापत्रात म्‍हटलं आहे.

समीर यांनी लिहिलं पत्र

पत्रात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी स्पष्ट केलं की, काही लोकांच्या 'चुकीच्या उद्देशा'मुळे माझ्या विरोधात कायदेशीर कारवाई होऊ नये. काही लोक त्यांना अटक करण्याची आणि तुरुंगात पाठवण्याची गोष्ट करत आहेत, असेही त्यांनी नमूद केलंय.

पत्रात काय लिहिलंय?

ते लिहितात-मी समीर वानखेडे आहे. सध्या एनसीबी डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे. चुकीच्या गोष्टींमधून मला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. काही अज्ञात व्यक्तींच्या माध्यमातून हा प्रयत्न होत आहे की, माझ्या विरोधात कायदेशीर कारवाई व्हावी.

पंच प्रभाकर साईल यांनी पाेलिसांकडे मागितले संरक्षण

पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. प्रभाकर साईल यांनी वानखेडेंविरोधात तक्रार केलीय. आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हणत त्यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केलीय. साईल यांनी क्रुझवरील ड्रगज प्रकरणी पंच म्हणून काम केलंय. त्यांनी याप्रकरणी अनेक गौप्‍यस्‍फोट केले आहेत.

प्रभाकर साईलने केले आरोप…

ड्रग्‍ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्‍यावर रविवारी गंभीर आरोप केले हाेते. आर्यन खान याची सुटका करण्‍यासाठी  समीर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची मागणी केली होती. तसेच एनसीबीने कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या होत्या, असे आराेप त्‍यांनी केले हाेते.

हेही वाचलं का?

SCROLL FOR NEXT