Latest

मी नथुराम गोडसे बोलतोय : माझ्याकडे सेन्सॉरच्या पत्राचा पुरावा, शरद पोंक्षेंचा…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे यांचे मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक खूप गाजले. या नाटकात शरद यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारलीय. आता याच नाटकावरून नवा वाद उद्भवलाय. या नाटकाचे पुन्ही ५० प्रयोग करणार अशल्याचे शरद यांनी जाहिर करताच या नाटकाच्या टायटलवरून वाद निर्माण झालाय. नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचे शीर्षक चोरल्याचा आरोप झाला आहे. आता यावर शरद पोंक्षे काय म्हणाले पाहा…

संबंधित बातम्या – 

शरद पोंक्षे यांच्यावर निर्माते नाट्य निर्माते उदय धुरत यांनी नाटकाचे टायटल चोरल्याचा आरोप केला आहे. ज्येष्ठ नाटककार प्रदीप दळवी लिखित 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटक होतं. या नाटकाचं दिग्दर्शन विनय आपटे यांनी केलं होतं. वादग्रस्त विषयामुळे हे नाटक सन २०१६ मध्ये थांबवण्यात आलं. तोपर्यंत शरद यांनी दुसरीकडे स्वत: 'हे राम नथुराम' नाटक आणलं.

या वादावरून शरद पोंक्षे यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 'हे राम नथुराम' या नाटकाचे २०१६ पासून ११० प्रयोग केले. त्यानंतर २०१८ मध्ये नाटक बंद केलं. पण, लोकाग्रहास्तव मी पुन्हा एकदा नाटकाचे प्रयोग करणार आहे. गोपाळ गोडसे यांचा नातू अजिंक्य गोडसेकडून मला जानेवारीच्या दरम्यान पुन्हा नाटक सुरु करण्याच्या मागणीसाठी पत्र आलं. त्यामुळे मी पुन्हा नाटक सुरु करण्याचा मी निर्णय घेतला.

दरम्यान, निर्मात्यांनी 'नथुराम गोडसे बोलतोय' या शीर्षकावर आक्षेप घेतला होता. तसे पत्र सेन्सॉरला गेलं. २०१६ मध्ये प्रयोगाच्या आधी अनेक नाट्यगृहे आरक्षित झाली होती. पण, शीर्षकाच्या नावावर वाद उद्भवल्याने ऐनवेळेला नाव काय ठेवायचे, म्हणून मला सेन्सॉरच्या ऑफिसमध्येच 'हे राम नथुराम' हे नाव सुचलं. या नाटकाचे नाव ठरल्याचे पत्र मी सेन्सॉरला पाठवलं होतं. शिवाय, आधीच्या निर्मात्यांनी पुढच्या १५ दिवसांत या शीर्षकावर कोणताही पुरावा दिला नाही तर ते शीर्षक मला परत मिळावं. १५ दिवसांत त्यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. याचा पुरावा आताही माझ्याकडे आहे. त्यामुळे मी सेन्सॉरला स्वतंत्रपणे पत्र लिहून हेच शीर्षक पुन्हा मिळावं, अशी मागणी केली. सेन्सॉरने मला नाव बदलून दिलं.

SCROLL FOR NEXT