Latest

मृणाल ठाकूर : बिकिनीतील फोटो मी करत नाही शेअर

अनुराधा कोरवी

नवी दिल्ली ः बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर लवकरच शाहीद कपूरसोबत 'जर्सी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करताना मृणालने आपल्या संदर्भातच एक मोठा खुलासा केला आहे.

अत्यंत सुंदर, स्टायलिस्ट आणि ग्लॅमरस दिसणार्‍या मृणाल ठाकूरने सांगितले की, बिकिनी वापरण्यात मला असहज वाटते. यामुळेच अन्य अ‍ॅक्ट्रेसप्रमाणे मी बिकिनीतील फोटो शेअर करत नाही. मी जशी आहे, तशीच मी राहण्याचा प्रयत्न करते. मी माझ्या मूडप्रमाणे कपडे परिधान करते. जसी मी घरात असते, तशीच बाहेरही राहण्याचा प्रयत्न करते. तसे पाहिल्यास मृणाल ही प्रत्येक प्रकारच्या ड्रेसमध्ये आकर्षक दिसते. मात्र, तिला बिकिनीत सहजपणा वाटत नाही.

दरम्यान, मृणालने 'धमाका', 'सुपर 30', 'बाटला हाऊस' यासारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. आता ती लवकरच 'जर्सी'या चित्रपटात सिल्व्हर स्क्रीनवर शाहीद कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT