Latest

Hruta Durgule : हृता दुर्गुळेचा हसू आणि आसूने भरलेला ‘कन्नी’ चा प्री टिझर भेटीला

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी 'कन्नी' येत्या ८ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे प्री टिझर सोशल मीडियावर झळकला आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या प्री टिझरमध्ये हसू आणि आसूही दिसत आहेत. यात मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे ( Hruta Durgule ) , शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्यात घनिष्ट मैत्री दिसत असून त्यात अजिंक्य राऊतही दिसत आहे. आता अजिंक्य यांच्या आयुष्यात नेमका का आला असेल? आणि यातून या चौघांची मैत्री काय वळण घेणार? चित्रपटात हे पाहण्यासाठी चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

संबंधित बातम्या 

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मिती केली आहे. क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी 'कन्नी' चे निर्माते आहेत.

दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात की, " पतंग आणि मांजाला जोडून ठेवण्याचे काम ज्याप्रमाणे 'कन्नी' करते तसेच आपल्या आयुष्यातही मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणारी एक 'कन्नी' असणे खूप महत्वाचे आहे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर याचे महत्व आपल्याला समजत जाते. या चित्रपटातून हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत आवर्जून पाहण्याचा आनंद घेवू शकता. 'कन्नी' हा चित्रपट ८ मार्च २०२४ रोजी चित्रपटगृहात येणार आहे."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT