Latest

Fighter Trailer : …और जान देश के नाम; हृतिक-दीपिकाच्या अॅक्शन सीन ‘फायटर’ चा ट्रेलर रिलीज

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर यांच्या आगामी 'फायटर' चित्रपट यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजे, २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. याच दरम्यान चित्रपटातील काही हटके लूक, तीन गाणी, टिझर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर ( Fighter Trailer ) चाहत्यांच्या भेटीस आला आहे. हा ट्रेलर पाहून चाहत्यांनी यातील कलाकारांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे त्यातील दमदार अॅक्शन सीनची चर्चा रंगू लागली आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेता हृतिक रोशनच्या एक्स (X) ट्विटरवर आगामी 'फायटर' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर ( Fighter Trailer ) रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये 'फायटर वो नहीं जो अपना ट्रार्गेट अचिव्ह करता है, वो है, जो उन्हे टोक देता हैं ' असे म्हणत ट्रेलरची सुरूवात होते. यानंतर आकाशातील विमानातून पाकिस्तानमध्ये हल्ल्या करताना हृतिक रोशनला दाखविले आहे. तर दिपिका यावेळी जमिनीवरून या मिशनचे नेतृत्व करताना दिसत आहे. याचदरम्यान तिच्यासोबत अनिल कपूरही दिसत आहेत. या ट्रेलरच्या कॅप्शमध्ये हृतिकने 'दिल आसमान के नाम, और जान देश के नाम । जय हिन्द!' असे लिहिलं आहे.

ट्रेलरमध्ये २६ -११ चा आणि पुलवामा येथील हल्ल्यात ४० जवान शहिद झाल्याने भारतीय सैनिकाची एक टिम बनवण्यात येते आणि त्यांना एक मिशन दिले जातं. या मिशनमध्ये हृतिक, दिपिका आणि अनिल कपूरची टिम बनवली जाते. ही टिम देशाच्या संरक्षणासाठी शुत्रूचा खात्मा करते असे दाखवण्यात आलं आहे. हा धमाकेदार ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतुक केलं आहे.

या ट्रेलरमध्ये कलाकारांची मैत्री, धैर्य आणि त्यागाचे सुंदर प्रदर्शन केलं आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यापासून देशाला वाचवण्याची आणि दहशतवाद्याला मारण्याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. मोठ्या पडद्यावर धमाका करणारा हा चित्रपट असून यात हृतिक-दीपिकाची केमिस्ट्रीही पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट प्रजासत्ताक दिनीच्या मुहूर्तावर म्हणजे, २५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

SCROLL FOR NEXT