Latest

IIFA Awards २०२३ : आयफा पुरस्कार सोहळ्यात हृतिक- आलिया भट्टने मारली बाजी; पहा यादी

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या आयफा अवॉर्ड्स २०२३ ( IIFA Awards २०२३ ) सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला 'विक्रम वेधा' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा यादीत अभिनेत्री आलिया भट्टला गौरविण्यात आले. आलियाला हा पुस्कार 'गंगूबाई काठियावाडी' मिळाला आहे. हा सोहळा अबूधाबी येथील यस बेटावर आयोजित करण्यात आला होता.

अबूधाबीमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस, रकुल प्रीत सिंह आणि नोरा फतेही, सुनिधी चौहान आणि शाहरूख खानसोबत अनेक सेलिब्रिटींनी सहभागी झाले होते. मात्र, विजेत्यांच्या यादीची चाहते प्रतिक्षा करत होते. दरम्यान हृतिकला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून घोषित करण्यात आले. या यादीत सर्वोत्कृष्ट चित्रपट 'दृष्यम २' ठरला. तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकारांमध्ये बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि मौनी रॉय यांनी बाजी मारली. या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ( IIFA Awards २०२३ )

आयफा अवॉर्ड्स २०२३ विजेत्यांची यादी खालील प्रमाणे

सर्वोत्कृष्ट चित्रपट- दृश्यम 2
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आर. माधवन (रॉकेट्री : द नंबी इफेक्ट)
मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स (पुरुष)- हृतिक रोशन (विक्रम वेधा)
मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स (स्त्री)- आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका (पुरुष)- अनिल कपूर (जुग जुग जियो)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिका (स्त्री)- मौनी रॉय (ब्रह्मास्त्र पार्ट वन : शिवा)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) – शांतनू माहेश्वरी (गंगुबाई काठियावाडी) आणि बाबिल खान (कला)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (स्त्री)- खुशाली कुमार (धोका : राऊंड द कॉर्नर)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजीत सिंग (केसरियाँ, ब्रह्मास्त्र)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- श्रेया घोषाल (रसिया, ब्रह्मास्त्र)
सर्वोत्कृष्ट संगीत- प्रितम चक्रवर्ती (ब्रह्मास्त्र)
सर्वोत्कृष्ट गीत- अमिताभ भट्टाचार्य (ब्रह्मास्त्र)
सर्वोत्कृष्ट मूळ कथा- जसमीत के रीन आणि परवीझ शेख (डार्लिंग्स)
सर्वोत्कृष्ट कथा (अडाप्टेड)- आमिल कियान खान आणि अभिषेक पाठक (दृश्यम 2)
प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी- रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा (वेड)
भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी- कमल हासन
चित्रपटातील फॅशनसाठी उत्कृष्ट कामगिरी- मनिष मल्होत्रा

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT