Latest

Navratri kadakani recipe : अशी करा खुसखुशीत कडाकणी; अजिबात मऊ नाही पडणार

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवरात्रीत खुसखुशीत कडाकणी कशी करावी, ती मऊ पडणार नाही, याची काळजी कशी घ्यावी? गोड कडाकणी नैवेद्‌यासाठी दाखवली जाते. साखर, गुळ, तेल, तूप, डालडा, मैदा आणि दूधापासून कडाकणी बनवली जाते. वेलदोडे पावडर घातल्यास कडाकणीला न्यारी चव येते.

साहित्य 

१) पावकिलो मैदा

२) एक कप रवा

३) डालडा

४) अर्धा चमचा तूप

५) चवीनुसार मीठ

६) दीड वाटी पीठी साखर

कृती 

१) परातीत मैदा, रवा आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घ्या. त्यानंतर गरम केलेला डालडा, तूप आणि पीठी साखर पीठावर घाला आणि पीठ व्यवस्थित पाणी घालून मळून घ्या. या पीठावर ओले केलेले सुती कापड झाकून किमान ६ तासांपर्यंत भिजत ठेवा.

२) त्यानंतर पाटा-वरवंट्यावर हे पीठ घ्या. त्यावर मध्येमध्ये दुधाचा भपका मारत वरवंट्याने बडवून घ्या.

३) बडवून झाल्यानंतर हे पीठ चपातीच्या आकाराचे गोळे करून घ्या. गोळे पोळपाटावर लाटून घ्या. त्यानंतर व्यवस्थित काठ असलेली वाटी घ्या. आणि त्याने प्रेस करून गोल आकाराच्या एक-एक कडाकणी करून घ्या आणि पेपरवर पसरवून ठेवा.

४) गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल उकळवून घ्या. तेल चांगले गरम झाल्यावर एक-एक करत कडकणी तळून घ्या. जसजसे कडाकणी गार होत जाईल तस तशी कडाकणी कडक होत जाते.

५) अशाप्रकारे दसऱ्याची स्पेशल असणारी कडाकणी ( kadakani recipe) तयार झाली आहे. गरमागरम चहासोबत कडाकणी खाण्याचा आनंद घ्या.

पहा व्हिडीओ : टेस्टी साबुदाणा थालीपीठ कसे कराल?

या रेसिपी वाचल्या का? 

SCROLL FOR NEXT