Latest

Medu Vada : कांदेपोहे खाऊन कंटाळा आलाय तर बनवा खुसखुशीत उडीद वडा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुलांच्या परीक्षा संपल्याने त्यांना सुट्यांचे वेध लागले आहेत. तर प्रत्येकाच्या घरात लहान मुलांची लूडबूड हा नेहमीच चर्चाचा विषय असतो. अशावेळी मग महिलांना सकाळी उठल्यावर नाष्ट्याला मुलांसाठी काय बनवायचे हा प्रश्न पडतो. प्रत्येक आईच्या मनात मुलांना पौष्टिक खाऊ द्यायला हवा हाच विचार असतो. दररोज नाष्ट्याला कांदे पोहे, शिरा, उप्पीट, उपमा, डोसा, इटली यासारख्या अनेक पदार्थ बनविले जातात. सारखे- सारखे हे पदार्थ खावून मग कंटाळा येतो. दरम्यान जर सकाळी नाष्ट्याला जर एखादा वेगळा पदार्थ असेल तर मज्जाच. अशावेळी मुलांसोबत घरच्यांना आवडेल असा चमचमीत आणि खुसखुशीत उडीद वडे बनवून द्या.. त्यासाठी जाणून घ्या रेसीपी… ( Medu Vada )

साहित्य-

उडीद डाळ- दोन वाटी
मुग डाळ- ४ चमचे
मीठ- चवीपुरते
हिंग- पाव चमचा
काळी मिरी- १०-१२ दाणे
ओले खोबऱ्याचे तुकडे- अर्धा वाटी
आलं- थोडा तुकडा
कडीपत्ता- १०- १२ पाने
हिरवी मिरची- अर्धा तुकडा
तेल- तळण्यासाठी
पाणी- आवश्यतेनुसार

कृती-

१, पहिल्यांदा एका भांड्यात दोन वाटी उडीदाची डाळ आणि चार चमचे मुग डाळ घेवून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी.

२. स्वच्छ पाण्याने डाळी भिजवून घेतल्यानंतर ४ ते ५ तासांसाठी त्यात पाणी घालून भिजवत ठेवा.

३. पाच तासानंतर डाळीतील चाळणीच्या सहाय्याने पाणी काढुन मिक्सरला बारीक करून घ्यावी.

४. हे मिश्रण वाटताना छोटे १ ते २ चमचे पाणी घातले तर चालते मात्र, जास्त पाण्याचा वापर करू नये.

५. मिक्सरमधील मिश्रण एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावे.

६. मिश्रणाला चांगले मळून ५- १० मिनिटांपर्यत झाकून ठेवावे.

७. यानंतर यात पाव चमचा हिंग, चवीपुरते मीठ, बारीक कुटून १०-१२ काळी मिरीचे दाणे, ओले खोबरे, बारीक चिरलेले आलं, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कडीपत्ता घालून मिश्रण एकसारखे करावे.

८. यानंतर एका कढाईत मंद गॅसवर तेल तापत ठेवावे.

९. हाताने मिश्रणाचे छोटे- छोटे पहिल्यांदा गोळे तयार करून नंतर त्याच्या मध्यभागी बोटाने दाबावे.

१०. असे केल्याने गोल वड्याच्या मध्यभागी होल पाडते.

११. यानंतर हाताने हळूवारपणे तेलात सोडून केसरी रंग येईपर्यत तळून घ्यावे. ( असे करणे शक्य नसल्यास पळीवर पाणी लावून त्यावर गोळा तयार करून मध्ये होल पाडावे आणि तेलात सोडावे.)

१२. तयार झालेले खुसखुशीत उडीद वडे खोबऱ्याची किंवा डाळींच्या चटणीसोबत सेवन करावे. ( Medu Vada )

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT