पुढारी ऑनलाईन डेस्क : रेल्वे तिकिट ऑनलाईन सेवेचा लाभ कोट्यवधी प्रवासी घेतात. यासाठी ( Indian Railway Catering and Tourism Corporation ) IRCTC ॲपचा वापर होतो. रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते खाद्यपदार्थ बुकिंगपर्यंत सर्व गोष्टींसाठी या ॲपचा माध्यमातून केल्या जातात. मात्र तुम्हाला माहित आहे का? ऑनलाईन रेल्वे तिकिट बुकिंग करताना तुम्ही केलेली छोटी चूक तुमचं बॅक खाते रिकामे करु शकते. यासाठी ऑनलाईन रेल्वे तिकिट बुक ( Railway online ticket ) करताना नेहमी कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती घेवूया…
IRCTC ने आपल्या वापरकर्त्यांना irctcconnect.apk नावाचे संशयास्पद अँड्रॉइड ॲप डाउनलोड करू नये, असे स्पष्ट केले आहे. तसेच व्हॉट्स ॲप आणि टेलिग्राम सारख्या सामान्यतः वापरल्या जाणार्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून असे बनावट धोकादायक ॲप्स पसरवले जात आहेत, असाही इशारा दिला आहे.
रेल्वे ऑनलाईन तिकिट बुकिंग करण्याबाबत IRCTC ने म्हटलं आहे की, "जर तुम्ही 'एपीके' फाइल स्थापित केली तर ते तुमच्या मोबाइल डिव्हाइसला धोका पोहचू शकतो. स्कॅमर UPI तपशील आणि इतर बँकिंग माहिती यासारखी वैयक्तिक माहिती मिळविण्यासाठी बनावट ॲप्स वापरात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांनी सतर्क राहून असे कोणतेही बोगस ॲप डाउनलोड करू नये. Google Play Store किंवा Apple Store वरून नेहमी IRCTC चे अधिकृत 'IRCTC Rail Connect' मोबाईल ॲप डाउनलोड करावे.", असे आवाहनही IRCTC ने केले आहे.
हेही वाचा :