Latest

Walk Exercise : तुम्‍ही दररोज किती पावले चालता? जाणून घ्‍या नवीन संशोधन काय सांगते…

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : Walk Exercise : चालणे हा विनाखर्च एक सर्वांगसुंदर व्‍यायाम आहे. आजवरच्‍या अनेक संशोधनात चालण्‍याचे फायदे तुम्‍ही वाचलेच असतील. चालणे आणि वयाेमान याचा थेट संबंध असल्‍याचेही स्‍पष्‍ट झाले आहे.  चालणे आणि मृत्यू होण्याचा धोका यांच्यात स्पष्ट दुवा आहे, असे युरोपियन जर्नल ऑफ प्रीव्‍हेटिव्‍ह प्रतिबंधात्मक कार्डिओलॉजीने केलेल्‍या नवीन संशोधनात दिसून आले आहे. कमी चालणारी व्‍यक्‍तीला हृदयरोग आणि लवकर मृत्यूचा धाेका अधिक असताे, असेही या  संशोधनात आढळले आहे. (Walk Exercise ) जाणून घेवूया नवीन संशोधनाविषयी…

फार पूर्वीपासून ज्ञात आहे की, चालणे हे हृदय अधिक निराेगी ठेवते. तसेच मनुष्‍याला दीर्घायुष्यही बनवते. या पूर्वीच्या काही संशोधनात असे सुचवले आहे की, आरोग्यविषयक फायदे मिळविण्यासाठी दररोज किमान ५ हजार पावले चालणे आवश्यक आहे. नुकताच  चालणे आणि आराेग्‍याला हाेणारे फायदे, यावर युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये संशाेधन अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येकाने दिवसाला 10,000 पावले चालण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे, परंतु बरेच लोक इतके पावले चालण्याच्या जवळ येत नाहीत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दैनंदिन जीवनात कमीत कमी किती चालणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, याबाबतही या अहवालात नमूद करण्‍यात आले आहे. (Walk Exercise)

Walk Exercise : दरराेज किती चालावे?

निराेगी व्‍यक्‍तीने दररोज सुमारे ३,९६७ पावले चालणे फायदेशीर ठरते. यामुळे अकाली मृत्यूचा धोकाही कमी होतो. तसेच दिवसातून 2,337 पावले चालणे हे  हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगामुळे मृत्यूचा धोका कमी करू शकते.

Walk Exercise : नियमित व्यायामामुळे कोणता परिणाम आरोग्यावर होतो?

नियमित व्यायाम केल्याने रक्तातील साखरेची पातळी आणि वजन नियंत्रित करण्यात मदत होते. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी हानिकारक घटक कमी करण्यास आणि संपूर्ण आरोग्य आणि कल्याण वाढविण्यात मदत करू शकते. विशेष म्‍हणजे नियमित चार हजारांपेक्षा अधिक पावले चालणे हे लिव्‍हरचे ( यकृत ) आरोग्‍य मजबूत होण्‍यास मदत करते, असेही नवीन संशाेधनात नमूद करण्‍यात आले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT