Latest

Ramsay Gangu : हॉरर चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक गंगू रामसे काळाच्या पडद्याआड

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क: दि रामसे ब्रदर्सचे दिग्गज सिनेमॅटोग्राफर, चित्रपट निर्माते गंगू रामसे यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी आज (दि.७) सकाळी ८ वाजता निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. Ramsay Gangu

कोण होते गंगू रामसे?

गंगू रामसे हे रामसे ब्रदर्सपैकी एक होते. त्यांचे ८० आणि ९० च्या दशकात हॉरर चित्रपट गाजले होते. ते प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि सिनेमॅटोग्राफर होते. त्यांचे वडील एफ. यु. रामसे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि चित्रपट निर्माता होते. त्यांनी हॉरर चित्रपटांच्या माध्यमातून इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली होती. चित्रपट निर्मितीत त्यांचे मोठे योगदान होते. Ramsay Gangu

Ramsay Gangu : गंगू रामसे यांचे चित्रपट

गंगू रामसे यांनी 'वीराना', 'दो गज जमीन के नीचे', 'पुराना मंदिर', 'सामरी', 'पुरानी हवेली', 'खोज', 'तहखाना' आदी चित्रपटांची निर्मिती केली होती. हे चित्रपट खूप गाजले होते. त्यांचे चित्रपट एकटे पाहताना भीती वाटायचे. भयपट निर्मितीतील त्य़ांचे कौशल्य वाखाणण्यासारखे होते.

गंगू रामसे यांनी अभिनेता सैफ अली खानचा पहिला चित्रपट आशिक आवारा या चित्रपटाचे सिनेमॅटिक केले होते. अभिनेता अक्षय कुमार यांच्या खिलाडियों का खिलाडी, सबसे बडा खिलाडी, मिस्टर अँड मिसेस खिलाडी, पांडव आणि मिस्टर बाँड यांसारख्या खिलाडी मालिकांमधील चित्रपटांची सिनेमॅटिक त्यांनी केली होती.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT