Latest

Nikita Dutta: अभिनेत्रीवर हल्‍ला करुन चाेरट्यांनी माेबाईल हिसकावला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

निकिता दत्ता (Nikita Dutta) या अभिनेत्रीने बिग बुल आणि कबीर सिंह यासारख्या चित्रपटातून वेगळी ओळख निर्माण केलीय. आता निकिता दत्ता हिला एका वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं. तिच्यासोबत मुंबईच्या रस्त्यावर ही घटना घडलीय. अभिनेत्रीवर हल्‍ला करुन चाेरट्यांनी माेबाईल हिसकावला. Nikita Dutta ने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून या घटनेविषयी माहिती दिली आणि लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला.

तिने लिहिलंय- 'काल माझ्यासोबत एक दुर्घटना घडली, जो ट्रॉमॅटिक होती. माझे पूर्ण २४ तास खराब गेले. मी सायंकाळी 7:45 वाजता बांद्रा येथे फिरायला गेले होते. अचानक दोन लोक माझ्या मागून बाईक वरून आला. डोक्यात मारलं. त्यामुळे मी थोड्या वेळासाठी सुन्न झाले. मागे बसलेल्या एका व्यक्तीने माझ्या हातातून फोन हिसकावून घेतला. मी काही तरी ॲक्शन घेणार, तोपर्यंत ते पळून गेले.

'३-४ सेकंदासाठी मी शॉकमध्ये होते. अखेर काय झालं? मी बाईकच्या मागे पळत गेले. पण, तोपर्यंत ते खूप दूर निघून गेले होते. तेथील आजूबाजूच्या दुसऱ्या लोकांनी माझी मदत केली. एका बाईकवाल्याने त्या चोरट्यांचा पाठलागही केला.

या घटनेनंतर खूप रडली निकिता

या धक्‍कादायक घटनेनंतर  मी खूप रडले. लोकांनी मला शांत केलं. पाणी पिण्‍यास दिलं. मी बांद्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा मॅसेज जागृतीसीठी लिहितेय. अपेक्षा करते की, या प्रकारच्या घटना कोणासोबत होऊ नयेत. आपल्या कष्टाची कमाई  अशा प्रकारे हिरावली जावू नये.

या चित्रपटांमध्ये केलंय काम

तिच्यासोबत जे घडलं ते खूपचं वाईट होतं. तिच्या पोस्टवर अभिनेता अभिषेक बच्चनने तिला काळजी घेण्यासाठी सांगितलंय. तिने बिग बुल चित्रपटामध्ये अभिषेक बच्चनच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारली होती. तर कबीर सिंह चित्रपटात जिया शर्माचा कॅमियो रोल केला होता.

SCROLL FOR NEXT