Latest

Covid उपचारात होमिओपॅथी वापराचे आदेश देऊ शकत नाही – दिल्ली उच्च न्यायालय

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोव्हिड – १९ (Covid 19)च्या उपचारासाठी होमिओपॅथी औषधांचा वापर करण्याचे आदेश न्यायालय हेऊ शकत नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. असे निर्णय इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चसारख्या संस्था घेऊ शकतात, असेही निकालात म्हटले आहे. (HC on Homeopathy in Covid 19)

मूख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमणियन प्रसाद यांनी हा निकाल दिला आहे. कोव्हिड सारख्या महामारीत कोणते वैद्यकीय प्रोटोकाल वापरायचे, ते इंडियन मेडिकल रिसर्चसारख्या संस्था ठरवू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, "होमिओपॅथी ही प्रभावी उपचारपद्धती आहे, आणि जगभर तिचा वापर होतो, हे जरी सत्य आहे. पण महामारीत कोणते प्रोटोकॉल वापरले पाहिजेत, हे अधिकार सरकारचे आहेत. सरकार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रोटोकॉल बनवते. तज्ज्ञांनी कष्टाने बनवलेल्या प्रोटोकॉलवर मत व्यक्त करणे योग्य ठरणार नाही."

डॉ. रवी एन नायर यांनी ही याचिका दाखल केली होती. कोव्हिडच्या नियंत्रणासाठी प्रोटोकॉलमध्ये Arsenicum Album – Phosphorus –Tuberculinum या होमिओपॅथी औषधाचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. पण न्यायालयाने ही याचिका मान्य केली नाही. याचिकाकर्ते नियमअटींचे पालन करून संशोधन सुरू ठेऊ शकतात, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT