Latest

हिंगोली : जखमी कोब्राला मिळाले जीवदान

स्वालिया न. शिकलगार

आखाडा बाळापूर : पुढारी वृत्तसेवा

मालेगाव तालुका कळमनुरी येथे बांधकामाचे उत्खनन करत असताना कोब्रा जेसीबीच्या धक्का बसल्याने जखमी झाला होता. तेथील जमलेल्या नागरिकांनी सर्पमित्र एस. के. सहन अंकुश टाक संदीप वाकडे या सर्पमित्रांना बोलावून तो पकडला. जखमी झालेल्या कोब्राला आखाडा बाळापूर येथील पशुवैद्यकीय श्रेणी-१ रुग्णालयात आणण्यात आले होते. येथील पशुवैद्यकीय कर्मचारी शेख अन्सार व पीआर काळे यांनी जखमी कोब्राला मलमपट्टी करून जीवदान दिले.

त्यानंतर या कोब्राला सर्पमित्रांकडे देण्यात आले. सर्पमित्र मालेगाव येथील शिव संत यांच्या निवासस्थानी या कोब्राला पकडले होते. त्या कोब्राला पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी जीवदान दिल्याने सर्पमित्रांनी आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT