Latest

Hindu Mahasabha: … तर मेरठचे नाव नथुराम गोडसे नगर करू ; हिंदू महासभेची घोषणा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन:  उत्तर प्रदेशातील मेरठ महापालिका निवडणूक लढविणार असल्‍याचे हिंदू महासभेने स्पष्ट केले आहे. यासाठी महासभेने येत्या मनपा निवडणूकीचा अजेंडा देखील स्पष्ट केला आहे. हा अजेंडा लोकांसमोर ठेवताना मनपा निवडणुकीत मेरठमध्ये हिंदू महासभेचा उमेदवार निवडून आल्यास मेरठ शहराचे नाव नथुराम गोडसे नगर करू, असे आश्वासन हिंदू महासभेने दिले आहे.

यावेळी सभेने आपल्या अजेंडा जाहीर केला. महासभेचे प्रवक्ता अभिषेक अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महासभा महापालिका, महापौर, नगरसेवक, नगरपालिका सरकारी संस्था अशा प्रत्येक स्तरावर आम्ही आमचे उमेदवार उभा करणार आहे. यासाठी संघटना देशभक्त (राष्ट्रभक्त) उमेदवार शोधणार आहे.

भारताला 'हिंदू राष्ट्र' बनवणे हे आमचे पहिले वचन असेल तर दुसरे प्रत्येक हिंदूने गाईंचे (गौ माता) संरक्षण करणे हे आमचे दुसरे मुख्य उद्धिष्ट असल्याचे प्रवक्ता अग्रवाल यांनी सांगितले. निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही सर्वप्रथम मेरठचे नाव बदलून नथुराम गोडसे नगर करणार असल्याचेही त्‍यांनी 'पीटीआय'शी बोलताना सांगितले. हिंदू महासभा ही धार्मिक धर्मांतर थांबवण्यासाठी काम करणार आहे. भाजप आणि शिवसेना आपल्या विचारधारेपासून दूर जात असल्याचा आरोपही यावेळी अग्रवाल यांनी या वेळी  केला.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT