पुढारी ऑनलाईन डेस्क : मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन आणि ए राजा यांना सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावर दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने (मद्रास उच्च न्यायालयाने) द्रमुक नेत्यांविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. सनातन धर्माबाबत उदयनिधी स्टॅलिन, पीके शेखर बाबू यांना आमदार आणि द्रमुकचे खासदार ए राजा यांना खासदार पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेविरोधात द्रमुकच्या नेत्यांनी मद्रास उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करत उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती अनिता सुमंत यांच्या खंडपीठाने द्रमुक नेत्यांना दिलासा देत त्यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. वकील पी विल्सन यांनी सांगितले की, हिंदू मुन्नानीच्या टीमने द्रमुकच्या नेत्यांविरुद्ध क्वो वॉरंटो याचिका दाखल केली होती, जी उच्च न्यायालयाने फेटाळली होती.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये द्रमुकचे नेते आणि तामिळनाडू सरकारचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केली होती आणि सनातन धर्माला संपवण्याची भाषा केली होती. उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानावरुन देशात मोठा गदारोळ झाला होता. द्रमुक नेत्याविरोधात अनेक एफआयआर दाखल करण्यात आले होते. हिंदू मुन्नानी नावाच्या संघटनेने या वादग्रस्त विधानावरून द्रमुक नेत्यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.
हेही वाचा