पुढारी ऑनलाईन डेस्क : ड्रीमगर्ल, बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलीय. ईशा ( Esha Deol ) लवकरच तिचा पती भरत तख्तानीसोबत घटस्फोट घेवून विभक्त होणार असल्याच्या माहिती समोर आली आहे. यामुळे ईशाने 'आई- वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत पुढे वारसा चालवला आहे काय?' असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे ईशा गेल्या काही दिवसांपासून सिनेमांपासून दूर असली तर सोशल मीडियावर सक्रिय आहे.
संबंधित बातम्या
एका रिपोर्टच्या मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा ( Esha Deol ) लवकरच पतीपासून विभक्त होणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ईशा देओल आणि तिचा पती भरत तख्तानीने सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत आहेत. याशिवाय ईशा नुकतेच पार पडलेल्या अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानच्या रिसेप्शन पार्टीला आई हेमा मालिनीसोबत स्पॉट झाली होती. दरम्यान ती पतीसोबत फारसी दिसलेली नाही. यामुळे हे दोघेजण कपल विभक्त होवून घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, हेमा मालिनी, धर्मेंद्र, ईशा देओल किंवा भरत तख्तानी यांनी कोणीच याबाबत अधिकृत्त माहिती दिलेली नाही. यामुळे खरोखरंच या कपलचा घटस्फोट होणार की नाही? यांची माहिती गुलदस्त्यात आहे.
दरम्यान दुसरीकडे ही माहिती सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांनी अनेक तर्क- वितर्क लावत कॉमेन्टसचा पाऊस पाडला. यात त्यांनी 'आई – वडिलांच्या कर्माची फळं मुलीला भोगावी लागत आहेत', 'या कपलचा घटस्फोट व्हायला नको', 'ईशाच्या आयुष्यात तिच्या आईप्रमाणे या गोष्टी व्हायला नकोत', ' दिवाळी पार्टीमध्ये ईशा एकटी होती', 'यापूर्वी भरत कायम ईशाच्यासोबतच असायचा', 'यंदाच्या वर्षी दोघांनी दिवाळी पार्टीचे देखील आयोजन केलं नाही', 'ईशाने पतीपासून विभक्त होवू नये असेच वाटतेय.' यासारख्या अनेक कॉमेन्टस नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
अभिनेत्री ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी २९ जून २०१२ रोजी को इस्कॉन मंदिरात लग्न केलं आहे. ईशा सध्या दोन मुलांची आई असून त्याची नावे 'राध्या' आणि 'मिराया' अशी आहेत.