Twinkle Khanna : ५० व्या वर्षी ट्विंकल खन्ना बनली पदवीधर; अक्षय कुमार म्हणाला, ‘तुझ्याबद्दल अभिमान …’ (video)

Twinkle Khanna
Twinkle Khanna

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा खिलाडी आणि अभिनेता अक्षय कुमारची सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख आहे. मात्र, अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) बॉलिवूडपासून काही दिवसांपासून दूर आहे. आता ट्विंकल खन्नाने वयाच्या ५० वर्षी पदवीधर झाली आहे. यानिमित्ताने तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून हा आनंद चाहत्यांना शेअर केलाय. तर दुसरीकडे पत्नीची ही आनंदाची बातमी ऐकून अक्षयने तिच्यासाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करून तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेत्री ट्विंकलने (Twinkle Khanna) तिचा लेक आरवसोबत शिक्षण घेत होती. लंडन विद्यापीठात पिक्शन रायटिंग मास्टर प्रोग्रेममध्ये तिने प्रवेश घेतला होता. यानंतर आता तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण झालं आहे. या आनंदानंतर ट्विंकलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने लिहिले आहे की, "अखेर मी पदवीधर झाले. हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. या दिवसाला खास करण्यात माझ्या कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. आपण नेहमीच काही ना काही करायला स्वत:ला प्रेरणा द्यायला हवी. मग ते योग्य असो किंवा अयोग्य". ही अनंदाची माहिती सोशल मीडियावर मिळताच अभिनेता अक्षय कुमार आणि चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय.

अक्षयने पत्नीच्या या यशासाठी खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की,"दोन वर्षांपूर्वी जेव्हा तू मला अभ्यास करण्याबद्दल सांगितलं होतं, त्यावेळी मला खरचं आश्चर्य वाटलं होतं. पण अभ्यासाच्या वेडापायी तू घेत असलेली मेहनत पाहून मला वाटलं की मी एका सुपरवुमनसोबत लग्न केलं आहे. घर, करिअर आणि मुलांकडे लक्ष देण्यासोबत तू विद्यार्थी म्हणूनदेखील चांगली कामगिरी केली आहेस. मीदेखील अभ्यास केला असता तर मला अधिक चांगल्या शब्दात तुझ्याबद्दलचा अभिमान व्यक्त करता आला असता. टीना…खूप शुभेच्छा आणि खूप-खूप प्रेम".

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अक्षय 'बडे मिया छोटे मिया' हा चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेता टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news