Latest

केंद्राचा संकल्प – नव्या राष्ट्रीय मार्गांच्या बाजूने हेलिपॅड; अपघातग्रस्तांना मिळणार तातडीची मदत

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन – देशात नव्याने होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या बाजून हेलिपॅड बनवण्यात यावेत, असा प्रस्ताव नागरी विमान वाहतूक मंत्रायलाने दिला आहे, अशी माहिती या खात्याचे मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी दिली आहे. रस्ते वाहतूक मंत्रायलायशी या संदर्भात चर्चा सुरू आहेत, असे ते म्हणाले. (Helipads For Highways)

अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगात संकटग्रस्तांना तातडीने सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी आणि इतर मदत पोहोचवण्यासाठी पायाभूत सुविधा सज्ज असल्या पाहिजेत, अशा संकट काळात हेलीपॅडचा वापर होईल, असे ते म्हणाले. दिल्लीत विमान वाहतूक मंत्रालयाच्या परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

शिंदे यांनी विमानसाठी लागणाऱ्या इंधनावरील व्हॅट कमी करण्याची विनंती आसाम, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामीळनाडू, दिल्ली, राजस्थान, बिहार आणि पंजाब या राज्यांना केली आहे. जर कर कमी केले तर या राज्यांत जास्त संख्येने विमानांची कनेक्टिव्हिटी पुरवता येईल, असे ते म्हणाले आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT