Latest

मोठी दुर्घटना : लष्करी सरावादरम्यान अमेरिकेच्या विमानाचा अपघात, ३ सैनिक ठार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: ऑस्ट्रेलियात लष्करी सराव सुरू असताना अमेरिकन लष्कराचे विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. या विमान दुर्घटनेत अमेरिकेचे तीन नौसैनिक ठार झाले असून, २० जण जखमी झाले आहेत, अशी माहिती 'बीबीसी'ने दिली आहे. या विमान अपघातावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनीही दु:ख व्यक्त केल्याचे वृत्त 'एएनआय'ने एक्सवरून (ट्विटर) म्हटले आहे.

उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये रविवारी सुरू असलेल्या लष्करी सराव दरम्यान अमेरिकेचे MV-22B ऑस्प्रे हे विमान डार्विनच्या उत्तरेकडील दुर्गम तिवी बेटांवर कोसळले. अपघातावेळी अमेरिकेच्या या लष्करी विमानात २३ सैनिक होते. यामधील तीन नौदल सैनिकांचा मृत्यू झाला असून, २० जण गंभीर जखमी झाले आहेत.

ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात आलेल्या प्रीडेटर्स रनमध्ये अमेरिकेकडून हे विमान आणि नौदलाचे सैनिक सहभागी झाले होते. यामध्ये यूएस, ऑस्ट्रेलिया, फिलीपिन्स, पूर्व तिमोर आणि इंडोनेशियाच्या 2,500 सैन्यांचा समावेश होता. दुर्घटना झालेल्या विमानात केवळ अमेरिकन नौ-दलाचे सैनिक होते, असेही बीबीसीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT