मुंबई : पुढारी वृत्तसेवा : Rain Update मुंबईत गेल्या आठवडाभरापासून पावसाची रिपरिप सुरू असताना आज (शुक्रवार) पावसाचा जोर काही प्रमाणात वाढला. अधून-मधून पडणाऱ्या मुसळधार सरींमुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गासह एलबीएस एस. व्ही. रोड व अन्य काही भागात वाहतूक कोंडी झाली आहे. पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्याही पाच ते दहा मिनिटे विलंबाने धावत आहेत.
Rain Update मुंबई शहर व उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. अधून मधून पडणाऱ्या मुसळधार सरींमुळे आतापर्यंत सुमारे 30 ते 35 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे वातावरण धुरकट झाल्यामुळे व रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या वाहनधारकांच्या प्रयत्नांमुळे वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग, लिंक रोड, एलबीएस मार्ग, एस. व्ही. रोड, दक्षिण मुंबई, दादर, परळ, धारावी, बांद्रा, कुर्ला, चेंबूर आदी भागातील अनेक रस्ते वाहतूक कोंडीत सापडले आहेत. मात्र शहरात कुठेही पाणी तुंबल्याच्या तक्रारी नाहीत. पावसामुळे सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे मात्र हाल झाले आहेत.
हेही वाचा :