Latest

Heavy rainfall: येत्या चार दिवसात कोकणात मुसळधार

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: गेल्या तीन ते चार दिवसात राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस सुरूच आहे. काही ठिकाणी अधिक तीव्रतेचा, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. दरम्यान येत्या चार दिवसात संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज (Heavy rainfall) आहे. दरम्यान विदर्भात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती आयएमडी मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी दिली आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, जुलै महिन्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल. दरम्यान पुढच्या तीन ते चार दिवसात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील हलक्या पावसाची शक्यता (Heavy rainfall) असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. अशी माहिती महाराष्ट्रातील पावसाच्या परिस्थितीवर बोलताना कांबळे यांनी दिली आहे.

दरम्यान येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडेल. तसेच अरबी समुद्रात सध्या सामान्य, मोसमी (Heavy rainfall)  हवामान असल्याने मच्छिमारांसाठी कोणताही इशारा नाही; असेही मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT