Latest

Rain Update: राज्यातील ‘या’ भागात चार दिवस अतिवृष्टीचा इशारा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: सध्या भारतात मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील पावसाने वेग घेतला आहे. देशातील अनेक राज्यात सध्या पुरपरिस्थिती आहे, तर काही राज्यात या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. येत्या चार दिवसात दक्षिण किनारपट्टीवरील कर्नाटक, कोकण आणि गोवा, ओडिशा येथे जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

राज्यातील या भागात जोरदार पावसाचा इशारा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या चार दिवसात दक्षिण किनारपट्टीसह गोव्याला ८ ते १० ऑगस्ट तर ओडिसाला ८ ते ९ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गुजरात, छत्तीसगड, गोवा, कोकण, मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, किनारपट्टी आणि उत्तर कर्नाटक, किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यालाही ७ ते १० ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन विभागाने दिला आहे. त्याचबरोबर उत्तरप्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील पश्चिम भागातही मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT