Latest

स्कूल बस सुरक्षित नसेल तर संस्था चालक जबाबदार – केरळ उच्च न्यायालय – Bus Safety Norms

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन – स्कूल बसमध्ये बिघाड असेल आणि सुरक्षेची मानके पाळली गेली नसतील तर संबंधित शिक्षण संस्थेच्या प्रमुखांना जबाबदार धरले जाईल, असा महत्त्वाचा निकाल केरळ उच्च न्यायायलाने दिला आहे. न्यायमूर्ती अनिल नरेंद्रन आणि पी. जी. अजितकुमार यांनी हा निकाल दिला आहे. (Bus Safety Norms)

"शिक्षक आणि शिक्षण संस्थांतील पदाधिकारी सुरक्षेच्या मानकांचे पालन न करणाऱ्या स्कूल बस वापरण्यासाठी परवानगी देत असतील तर त्यांना मुलांची कसलीच काळजी नाही, असा अर्थ होतो," असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.

"सुरक्षेच्या मानकांचे पालन न करणाऱ्या तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियम पाळले जात नसतील तर अशा स्कूल बस भाड्याने घेतल्याबद्दल शिक्षण संस्था चालक आणि या ट्रीपवर असणारे शिक्षण जबाबदार असतील. तसेच त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हावी," असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.

अशा प्रकारच्या बस या शाळेच्या आवारात दिसूच नयेत, जर असतील तर शाळेच्या प्रशासनाने चालक आणि मालक यांच्या विरोधात तक्रार दिली पाहिजे.

केरळमधील वडकेनचेर्री येथे झालेल्या बस अपघातात पाच विद्यार्थ्यांसह नऊ जणांचा बळी गेला होता. या घटनेची दखल घेत उच्च न्यायालयाने स्वअधिकारात हे आदेश दिले आहेत. या घटनेत एका टुरिस्ट बसचा वापर करण्यात आला होता. सुरक्षेसंदर्भाती जी मानके ठरलेली आहेत, त्याचे पालन केले गेले नव्हते, असे न्यायालयाला दिसून आले होते. अशा प्रकारच्या बस सार्वजनिक ठिकाणी येतातच कशा, अशा शब्दांत न्यायलयाने फटकारले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT