Latest

HDFC & SBI बॅंकांकडून मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ, ग्राहकांना फायदा

backup backup

मुंबई, पुढारी ऑनलाईन : खासगी क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या एचडीएफसी बॅंकेच्या आणि सार्वजिनक क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या एसबीआय बॅंकेच्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. कारण, या बॅंक्सनी आपापल्या ग्राहकांच्या मुदत ठेवीवरील व्याजाचा दर वाढवला आहे. (HDFC & SBI)

एचडीएफसी बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार २ कोटींपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवीवरील व्याज दर ५-१० बेसिस पाॅंईटनं वाढविण्यात आलं आहे. त्याचबरोबर हे नियम १४ फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत. एचडीएफसी बॅंक ही ७ दिवस ते १० वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीची सुविधा देते. त्याचबरोबर मुदत ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवक अधिक व्याजसुद्धा देते. ७ ते १० वर्षांच्या मुदत ठेवीवर २.५० टक्के ते ५.६० टक्के या दरम्यान व्याजाचा दर मिळतो. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुदत ठेवीर ३ ते ६.३५ टक्के दरम्यान व्याजाचा दर मिळतो. (HDFC & SBI)

एसबीआय बॅंकेनेदेखील २ वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या मुदत ठेवीवरील व्याज दरामध्ये १०-१५ बेसिस पाॅईंटची वाढ केलेली आहे. त्यामुळे ७ ते १० वर्षांच्या मुदत ठेवीवर जो व्याज मिळतो, त्यात २.९ टक्के ते ५.५ टक्क्यादरम्यान असेल. तसेच ज्येष्ठ नागरिकांना ५० बेसिस पाॅईंड अतिरिक्त मिळतील. १५ फेब्रुवारी २०२२ पासून हे दर लागू झालेले आहेत.

हे वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT