Latest

cryptocurrency: क्रिप्टोकरन्सी क्षेत्रासाठी हवाला प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी लागू

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली;पुढारी वृत्तसेवा: क्रिप्टोकरन्सी क्षेत्रासाठी हवाला प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. क्रिप्टोकरन्सी क्षेत्राच्या नियमनासाठी मागील काही काळात अनेक उपाय योजण्यात आलेले आहेत. त्यात आणखी एका उपायाची भर पडली आहे. केंद्र सरकारच्या या नियमामुळे क्रिप्टोकरन्सी क्षेत्रावरील मर्यादा येणार आहेत.

क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग, सेफ किपिंग तसेच वरील दोन्ही बाबींशी संबंधित आर्थिक सेवा कामांसाठी हवाला प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी लागू असतील, असे अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या नोटिशीत म्हटले आहे. क्रिप्टोकरन्सीसारख्या डिजिटल मालमत्ता प्लॅटफॉर्मसाठी जगभरात कडक नियम केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात देखील अशा डिजिटल मालमत्तांचे प्लॅटफॉर्मचे नियमन करण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

सरकारने गतवर्षी क्रिप्टो क्षेत्राचे करविषयक नियम कठोर केले होते. यात क्रिप्टो ट्रेडिंगवर लावण्यात आलेल्या लेव्हीचा समावेश होता. क्रिप्टोकरन्सी नियम कडक केले जात असल्याने तसेच जागतिक बाजारात क्रिप्टो मालमत्तांच्या दरात आलेली अस्थिरता यामुळे भारतातील क्रिप्टोची उलाढाल मंदावली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT