Latest

नूहमध्‍ये आज हिंदू संघटनांची शोभा यात्रा : इंटरनेट सेवा बंद, शाळांना सुटी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हरियाणातील नूह येथे आज हिंदू संघटनांनी शोभा यात्रेचे आयोजन केले आहे. मागील काही दिवसांपूर्वी येथे जातीय हिंसाचार झाला होता. त्‍यामुळे प्रशासनाने या शाभा यात्रेस परवानगी नाकारली आहे. येथील सुरक्षा व्‍यवस्‍थेत वाढ केली आहे. दरम्‍यान, प्रतिबंधात्मक आदेशामुळे बाहेरील लोकांना जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नूह जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच सोमवारी शैक्षणिक संस्थांसह बँका बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मोबाइल इंटरनेट आणि मोठ्या प्रमाणात एसएमएस सेवा बंद केल्या आहेत. तसेच जमावबंदीचेही आदेश देण्‍यात आले आहेत.

नूहमध्‍ये ३१ जुलै रोजी विहिंपच्‍या मिरवणुकीवर जमावाने हल्‍ला केला. यानंतर झालेल्‍या हिंसाचारात ६ जण ठार झाले होते. या हिंसाचाराचा झळा गुरुग्राममध्‍येही पसरल्‍या. आता आज पुन्‍हा एकदा शोभा यात्रेचे आवाहन करण्‍यात आल्‍याने प्रशासाने पोलिसांसह निमलष्‍करी दलाच्‍या ३० कंपन्‍या तैनात करण्‍यात आल्‍या आहेत. तसेच आंतरराज्य आणि आंतरजिल्हा सीमेवरही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. यात्रेसाठी विहिंपच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी रविवारी भाविकांना यात्रा काढण्याऐवजी सोमवारी मंदिरांमध्ये प्रार्थना करण्यास सांगितले. या यात्रेला परवानगी देण्‍यात आली नसल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. दरम्‍यान, हरियाणा पोलिसांचे 1,900 कर्मचारी आणि निमलष्करी दलाच्या 24 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रवेश मार्ग सील करण्यात आले असून मल्हार मंदिराकडे जाणारा रस्ताही बंद करण्यात आला आहे, असे प्रवक्त्याने सांगितले. यात्रेला परवानगी नाकारली असली तरी आज ( दि. २८) सकाळी जिल्‍हा प्रशासनाने १० ते १५ साधूंना जलाभिषेकासाठी नल्हारेश्वर मंदिरात जाण्याची परवानगी दिली. याशिवाय हिंदू संघटनांच्या १३ जणांनाही परवानगी देण्‍यात आल्‍याचे सूत्रांनी सांगितले

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT