Latest

Haryana Nuh violence | नूह हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग, हरियाणाच्या गृहमंत्र्यांचा दावा

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : नूह येथील हिंसाचारप्रकरणी (Haryana Nuh violence) हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज (Haryana Home Minister Anil Vij) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ३१ जुलै रोजी नूह येथे झालेला हिंसाचार पूर्वनियोजित होता आणि त्यात सहभागी असलेल्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरु असल्याचे विज यांनी म्हटले आहे. "टेकडीवरुन गोळ्या झाडण्यात आल्या. छतावर दगड सापडले आहेत आणि मोर्चे उभारण्यात आले. हा पूर्वनियोजित कट होता आणि आम्ही या प्रकरणी तपास करत आहोत. मंदिरांजवळ लोक शस्त्रे घेऊन जमले होते, यावरुन हे पूर्वनियोजित होते हे स्पष्ट होते," असे विज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

लोकांनी ज्या प्रकारे घेरले होते त्यामागे मोठा गेम प्लॅन होता. लोक मंदिरांच्या शेजारी असलेल्या टेकड्यांवर चढले. त्यांच्या हातात काठ्या होत्या. काठ्यांची आधीच कोणीतरी व्यवस्था केली असावी. गोळ्या झाडण्यात आल्या. एंट्री पॉइंटवर लोकांची गर्दी झाली होती. हे सर्व योग्य नियोजनाशिवाय शक्य नाही. काही लोकांनी शस्त्रांचीही व्यवस्था केली होती. हा सर्व एका कटाचा भाग आहे. सविस्तर तपासाशिवाय आम्ही कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही, असे विज यांनी स्पष्ट केले.

विज पुढे म्हणाले की, नूह हिंसाचाराशी संबंधित नोंदवलेल्या कोणत्याही प्रकरणात कारवाई केली जाईल. "आवश्यक असल्यास हिंसाचार करणार्‍यांवर बुलडोझरचादेखील वापर केला जाईल. लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत."

हिंसाचाराच्या संदर्भात आतापर्यंत २०२ लोकांना अटक करण्यात आली आहे आणि एकूण १०२ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. याशिवाय ८० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. नूह येथे ३१ जुलै रोजी झालेल्या बृजमंडल जलाभिषेक यात्रेदरम्यान दोन समुदायांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात दोन होमगार्ड आणि चार नागरिकांसह ६ जणांचा मृत्यू झाला होता.

ते म्हणाले की, नूहमधील कर्फ्यू वेळोवेळी शिथिल केला जात आहे. अधिकारी परिस्थितीचे मूल्यांकन करत आहेत आणि परिस्थिती जसजशी सामान्य होईल, त्यानुसार इंटरनेट सेवा पुर्ववत केली जाईल. शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, असेही ते म्हणाले. (Haryana Nuh violence)

दरम्यान, पानिपतमध्ये नूह हिंसाचारात ठार झालेल्या एका व्यक्तीच्या घराजवळील दुकानाची गुरुवारी संध्याकाळी उशिरा कथितपणे तोडफोड करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरांनी दुकानाजवळील दोन तोडफोड केली.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT