Latest

व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन करताना हर्षवर्धन पाटील यांच्या पायाला ‘फ्रॅक्चर’

अमृता चौगुले

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  इंदापुरात तालुकास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धांचे उद्घाटन करताना शुक्रवारी (दि. 8) विद्यार्थ्यांसमवेत व्हॉलिबॉल खेळताना पाय घसरल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पाय फ्रॅक्चर होऊन ते जखमी झाले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार ते घेत असून, आपण सर्वांच्या सेवेत प्रत्यक्ष उपलब्ध नसलो तरी फोनद्वारे मी व माझे कार्यालय आपणास उपलब्ध असेल. आपण काळजी करण्याचे कारण नाही. मी आपणा सर्वांच्या सेवेत लवकरच पुन्हा दाखल होईन, असे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT