पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया कप 2023 साठी (asia cup) टीम इंडियाची (team india) लवकरच घोषणा होऊ शकते. 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. टीम इंडियाला आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळायचे आहेत. या संघाचे कर्णधारपद रोहित शर्माच्या (rohit sharma) हाती असेल. त्याचवेळी उपकर्णधारपदाबाबत बदल होण्याची शक्यता आहे. सध्या टीम इंडियाच्या वनडे संघाचा उपकर्णधार हा हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आहे. नुकत्याच झालेल्या मालिकेदरम्यान त्याने ही जबाबदारी सांभाळली आहे. पण आशिया कप स्पर्धेदरम्यान, या जबाबदारीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह (jasprit bumrah) अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हे आगामी आशिया कप आणि 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) स्पर्धेसाठी भारतीय संघाचे उपकर्णधार होण्यासाठी आघाडीवर आहेत. पंड्याला टीम इंडियाचा नियमित टी-20 आंतरराष्ट्रीय कर्णधार बनवण्यात आले आहे, तर बुमराह सध्या आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत संघाचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, बुमराहने पुनरागमन करताच हार्दिकला आव्हान दिले आहे. तो वनडे संघाचा उपकर्णधार बनेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, 'जर तुम्ही नेतृत्वाच्या बाबतीत अनुभव बघितला तर बुमराह पंड्यापेक्षा पुढे आहे. त्याने 2022 मध्ये कसोटी संघाचे नेतृत्व केले. दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय दौऱ्यात पंड्यापूर्वी तो वनडे संघाचा उपकर्णधारही होता. त्यामुळे बुमराह आशिया कप आणि विश्वचषक या दोन्ही मोठ्या स्पर्धांसाठी एकदिवसीय संघाचा उपकर्णधार (team india odi vice captain) बनल्यास आश्चर्य वाटणार नाही. जवळपास वर्षभरानंतर पुनरागम करणा-या बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आयर्लंडविरुद्ध खेळलेला पहिला टी-20 सामनाही जिंकला आहे. संघ व्यवस्थापन त्याच्याकडे पुन्हा महत्त्वाची जबाबदारी देईल अशी शक्यता आहे.'