Latest

Hardik Pandya on Captaincy : धोनी, द्रविड यांच्यामुळे नव्हे तर ‘या’ खेळाडूमुळे हार्दिकच्या कॅप्टनशिपला मिळाली झळाळी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : हार्दिक पंड्याने श्रीलंकेविरोधातील टी20 मालिका जिंकल्यानंतर आपल्या नेतृत्व करण्याच्या शैलीबाबत विधान केले आहे. हार्दिकने नेतृत्व करण्याचा क्षमतेमध्‍ये परिपक्वता कशी आली? याबाबत सांगितले आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी किंवा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना यांचे श्रेय दिलेले नाही. (Hardik Pandya on Captaincy)

गुजरात टायटन्सने हार्दिकच्या नेतृत्वात आयपीएल २०२२ मध्ये टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. या तिन्‍ही मालिका भारताने हार्दिकच्या नेतृत्वात जिंकल्या आहेत. श्रीलंकेविराधातील मालिकेत विजय मिळवल्यानंतर हार्दिकने आपल्या कॅप्टनशिपबाबत मतं व्यक्त केले आहे. (Hardik Pandya on Captaincy)

आशिष नेहरा यांच्यामुळे माझ्या नेतृत्व करण्याच्या क्षमतेत सुधारणा

गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहरा यांच्यामुळे माझ्या नेतृत्व करण्याच्या क्षमतेत सुधारणा झाली, असे मत हार्दिक पंड्याने व्यक्त केले आहे.  तो म्हणाला, "आशिष नेहरा यांच्यामुळेच माझ्या नेतृत्व करण्याच्या क्षमतेत वाढ झाली. नेहरा यांनी माझ्या आयुष्यात मोठे बदल केले. आम्ही दोघेही क्रिकेटबाबत सारखाच विचार करतो. त्यांच्यामुळे माझ्या कॅप्टनशिपला झळाळी मिळाली. मला गरज होती तेव्हा, ते माझ्या पाठीशी राहिले." (Hardik Pandya on Captaincy)

२०२१ च्या टी20 विश्वचषकानंतर असे केले पुनरागमन

२०२१ च्या टी20 विश्वचषकानंतर हार्दिक पंड्याला फिटनेसच्या कारणास्तव भारतीय संघातून बाहेर व्‍हावे लागले होते. यादरम्यान त्याने आपल्या फिटनेसवर काम केले. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या गुजरात टायटन्सने त्याला कर्णधारपदाची संधी दिल्याने सर्वांचे डोळे विस्फारले होते. आयपीएल लिलावात दिग्गज खेळाडूंवर बोली लावली नसल्याने गुजरातच्या संघ दुबळा मानला जात होता. मात्र, हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला. त्यामुळे हार्दिकला भारतीय संघात पुनरागमन करणे सोपे झाले.

बडौद्याच्या अंडर-१६ संघाचा कर्णधार होता हार्दिक

हार्दिक पंड्या हा बडौद्याच्या अंडर-१६ संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर आयपीएलमध्ये त्याला गुजरात टायटन्सचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. हार्दिकच्या नेतृत्वात भारतीय संघाने आर्यलंड आणि न्यूझीलंडविरोधातील मालिका आपल्या नावावर केली होती. हार्दिक सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कायमस्वरूपी कर्णधार बनण्याच्या शर्यतीत आहे. (Hardik Pandya on Captaincy)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT