Latest

Har Ghar Tiranga : दहशतवादी मट्टूच्या भावाने अभिमानाने फडकवला तिरंगा (व्हिडिओ)

सोनाली जाधव

श्रीनगर : हिजबुल मुजाहिद्दीनचा खतरनाक दहशतवादी जावेद मट्टूच्या सख्खा भाऊ रईस मट्टू याने रविवारी सोपोर भागात तिरंगा फडकावत देशविघातक शक्तींना सणसणीत चपराक लगावली आहे. माझ्या भावाने चूक केली; पण दहशतवादाचा मार्ग विनाशाकडेच जातो, असे सांगत त्याने तरुणांना मुख्य प्रवाहात राहण्याचेच आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याआवाहनानुसार रविवारपासून देशभर हर घर तिरंगा मोहीम सुरू झाली. श्रीनगरात नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. एकेकाळी बंदुकांच्या फैरी आणि तणाव असे वातावरण स्वातंत्र्य • दिनाच्या आसपास दिसायचे. पण रविवारी अवघे श्रीनगर तिरंगी राष्ट्रध्वजांच्या रंगांत रंगले. काश्मिरातील हिंदू, मुस्लिम सारे नागरिक या स्वातंत्र्योत्सवात उत्साहाने सहभागी होत असताना सर्वांची छाती अभिमानाने फुलून यावी असा प्रसंग सोपोर येथे बघायला मिळाला. तो म्हणाला, माझ्या भावाने चूक केली. दहशतवादाचा मार्ग हा विनाशाकडेच जातो. तरुणांनी सावध होत या मार्गापासून दूर होत मुख्य प्रवाहातच राहिले पाहिजे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT