Latest

HBD : ‘शादी मे जरूर आना’ फेम कृति खरबंदा विषयी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

स्वालिया न. शिकलगार

बॉलीवूडची सुंदर अदाकारा कृति खरबंदा हिचा आज २९ ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. ती बॉलीवूडमधील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने खूप कमी वयात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. कृति खरबंदा हिने आपल्या करिअरची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटांतून केली होती. या औचित्याने जाणून घेऊया तिच्याविषयी या खास गोष्टी.

कृति खरबंदाचा जन्म २९ ऑक्तोबर, १९९० रोजी दिल्लीतील पंजाबी परिवारात झाला. तिने आपल्या सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले होते. पुढे तिचे कुटूंब बंगळुरूमध्ये शिफ्ट झालं. तिने बंगळुरूमधून पुढील शिक्षण घेतलं.

कृतिला बालपणापासून अभिनयाची आवड होती. कृतिने शाऴेत आणि कॉलेजमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला होता.

तिने ज्वेलरी डिझायनिंगमध्ये डिप्लोमा केलाय. ती कॉलेजमध्ये असल्यापासून मॉडलिंग करायची. तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केलंय. तिने अभिनयाची सुरुवात तमिळ चित्रपटातून केली होती.

कृति पहिल्यांदा तमिळ चित्रपट बोनीमध्ये दिसली होती. हा चित्रपट २००९ मध्ये रिलीज झाला होता. तिचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाल दाखवू शकला नाही. परंतु, चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.

यानंतर तिने कन्नड चित्रपटात डेब्यू केला. अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केल्यानंतर बॉलीवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. तिने इमरान हाशमीचा चित्रपट राज: रीबूटमधून बॉलीवूड डेब्यू केला. हा चित्रपट म्हणावा तसा चालला नाही. पुढे गेस्ट इन लंडन आणि शादी में जरूर आना यासारखे चित्रपट केले.

kriti kharbanda

शादी में जरूर आना हा चित्रपट हिट ठरला. गाणी, अभिनय आणि चित्रपटाची कहाणी सर्वचं गोष्टींनी हा चित्रपट लोकप्रिय ठरला. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत होता.

तिने वीरे की वेडिंग, यमला पगला दीवाना फिर से, हाउसफुल ४ आणि पागलपंती यासारखे चित्रपट केले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT