Latest

HBD Jr NTR : साऊथचा सर्वात महागडा सुपरस्टार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

ज्युनियर एनटीआर (HBD Jr NTR) चित्रपटांसाठी प्रचंड मेहनत घेतो. तो मोठा स्टार असूनही त्‍याचा साधेपणा चाहत्‍यांना भावतो. चित्रपटाच्या सेटवर वेळत पोहोचणं असो (HBD Jr NTR) वा आपल्या भूमिकेसाठी मेहनत. यामध्‍ये तो नेहमीच अग्रेसर असतो. त्याचमुळे तो चित्रपटांमध्ये यशस्वी ठरतो. प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रेम मिळतं. ज्युनियर एनटीआर हा दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे. ज्युनिअर एनटीआरच्या स्टारडममध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. आज २० मे रोजी ज्युनियर एनटीआर वाढदिवस आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घ्या.

ज्युनियर एनटीआर नंदामुरी कुटुंबातील आहे. त्यांचे कुटुंब आंध्र प्रदेशातील सर्वात शक्तिशाली कुटुंबांपैकी एक आहे. त्यांच्या वडिलांचे नाव नंदामुरी हरिकृष्ण आणि आईचे नाव शालिनी भास्कर राव आहे.

ज्युनियर एनटीआर यांचे आजोबा एनटी रामाराव हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेतेही होते. फक्त आजोबा आणि वडीलच नाही तर ज्युनियर एनटीआरच्या कुटुंबातील इतर सदस्य देखील राजकारण आणि चित्रपट या दोन्हींशी संबंधित आहेत. ज्युनियर एनटीआरचा सावत्र भाऊ अभिनेता-निर्माता नंदामुरी कल्याण राम, अभिनेता-राजकारणी नंदामुरी बालकृष्ण आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू हे नातेवाईक (पुतणे) आहेत.

रिहर्सलशिवाय डान्स करण्यात पटाईत

ज्युनियर एनटीआरने १९९१ मध्ये ब्रह्मश्री विश्वामित्र चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. ज्युनियर एनटीआरने २००१ मध्ये 'स्टुडंट नंबर १' या चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. ज्युनियर एनटीआर हा त्याच्या सिंगल टेक, डायलॉग डिलिव्हरी आणि रिहर्सलशिवाय डान्स सीक्वेन्ससाठी प्रसिद्ध आहे.

एनटीआरने त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी नंदी पुरस्कार, आयफा पुरस्कार, फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट तेलुगू पुरस्कार जिंकले आहेत.

कुटुंबासोबत ज्यु. एनटीआर

ज्युनियर एनटीआर लक्झरी जीवनशैली

ज्युनियर एनटीआर ९९९९ हा आकडा खूप भाग्यवान मानतो. या क्रमांकाशी संबंधित त्याच्याकडे अनेक वाहने आहेत. ज्युनियर एनटीआर हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये असलेल्या एका आलिशान घरात त्याच्या कुटुंबासह राहतो. या घराची किंमत सुमारे २५ कोटी असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय बंगळृूर आणि कर्नाटकमध्येही त्याची अनेक आलिशान घरे आहेत.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती

तुम्हाला माहिती आहे का, ज्युनियर एनटीआर हा मृत्यूच्या जबड्यातून परत आला आहे. ज्या ठिकाणी त्याचे वडील आणि भावाचा अपघात झाला होता, त्याठिकाणी एनटीआरचाही कारचा अपघात झाला होता.

साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिध्द अभिनेते ज्युनियर एनटीआरचे वडील नंदमूरी हरिकृष्णा यांचा कार अपघातात मृत्यू झाला होता. आंध्र प्रदेशात कवली येथे एका लग्नसमारंभाला जाताना नंदमूरी यांच्या कारचा अपघात झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा अपघात त्याच जागी झाला, जिथे काही वर्षांपूर्वी नंदमूरी यांचा मोठा मुलगा राम नंदमूरीचाही कार अपघातात मृत्यू झाला होता.

जेथे भाऊ-वडिलांचा झाला होता मृत्यू, तेथेच Jr NTR चाही अपघात

नंदमूरी हरिकृष्णा यांचा मुलगा राम नंदमूरी एक चित्रपट निर्माता होता. अकूपामु येथे त्‍यांच्‍या कारला अपघात झाला होता. वडील आणि भावाप्रमाणेच एनटीआर ज्यु.चा देखील याच मार्गावर अपघात झाला होता. काळ आला होता; पण वेळ आली नव्हती. सुदैवाने तो या अपघातातून बचावला हाेता. २००९ मध्ये जेव्हा एनटीआर ज्यु. एका कार्यक्रमातून परत येत होता. तेव्हा त्याच्या कारचा अपघात झाला. या दुर्घटनेत त्याला किरकोळ दुखापत झाली होती.

ज्यु. एनटीआर दोन मुलांसमवेत

एनटीआर ज्यु. विषयी माहितीये का?

साऊथचा ॲक्शन स्टार ज्युनियर एनटीआरचा जन्म २० मे, १९८३ रोजी हैदराबाद येथे झाला. आंध्रचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज अभिनेते एनटी रामारावचा नातू म्हणून त्याची ओळख आहे. ॲक्शन, डान्स आणि अभिनय या तिन्ही गोष्टींमध्ये एनटीआर ज्युनियरचा दबदबा आहे. यासाठीच त्याला हिटस्टार देखील म्हटलं जातं.

टीव्हीवरही हिट एनटीआर ज्यु.

एनटीआर ज्युनियरचं खरं नाव तारक असे आहे, हे खूप कमी लोकांना माहिती असेल. एनटीआर ज्युनियरने टीव्हीवर बिग बॉस (तेलुगु) शो होस्ट केलं आहे. २०१७ मध्ये हा शो सर्वात हिट शोचाचा एक भाग होता. एनटीआर ज्यु. चे नाव फोर्ब्स इंडिया सेलेब्रिटीजच्या यादीत दोनवेळा होते. एनटीआर ज्यु. ॲक्शन चित्रपटांतील वेगवेगळ्या अवतारासाठी ओळखला जातो.

मृत्यूच्या जबड्यातून परत आलाय एनटीआर

२००९ मध्ये निवडणुकीच्या प्रचारावेळी एनटीआर ज्युनियर खूप जखमी झाला होता. अपघातातूनही तो बचावला  होता.

SCROLL FOR NEXT