पुढारी ऑनलाईन डेस्क : वयाच्या १९ व्या वर्षी साऊथ इंडस्ट्रीमधून अभिनयाचे करिअर सुरु करणारी इलियाना 'डी'क्रुज आज केवळ साऊथच नाही तर बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. इलियानाचा जन्म १ नोव्हेंबर, १९८६ रोजी मुंबईत झाला आणि तिने आधी मॉडलिंग केले आणि नंतर अभिनय क्षेत्रात नशीब आजमावले. (Ileana D'Cruz) तिचा पहिला साऊथ चित्रपट देवदासु होता. यातील भूमिकेसाठी तिला बेस्ट न्यू कमर ऑफ साऊथ फिल्मफेअर ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. तुम्हाला माहितीये का, इलियाना बालपणी एका गंभीर आजाराने त्रस्त होती.
संबंधित बातम्या –
इलियानाला स्लीपिंग डिसऑर्डर नावाचा आजार होता. झोपेत चालण्याचा हा आजार होता. हा इतका त्रासदायक आजार होता की, कधी कधी पायावर सूज आणि जखमाही दिसायच्या. यानंतर तिने एक्सपर्टचा सल्ला घेतला आणि स्लीपिंग डिसऑर्डरवर नियंत्रण मिळवले.
इलियाना डी क्रूज मूळची गोव्याची राहणारी आहे. तिने गोव्याच्या सेंट झेवियर्स हाय सेकेंडरी स्कूलमधून शिक्षण घेतले आणि मुंबईला रवाना झाली. २०१२ मध्ये तिने बॉलीवूड चित्रपट बर्फीमधून हिंदी चित्रपट करिअरला सुरुवात केली होती. इलियाना आपल्या पर्सनल आयुष्याविषयी खूप चर्चेत राहिलीय. तिचे अफेअर कॅटरीना कैफचा भाऊ सेबेस्टियन लॉरेंट मिशेलसोबत राहिले आणि नुकताच ती एका मुलाची आईदेखील झालीय.