Latest

HBD Deepika Padukone : XXX शिवाय दीपिकाने ‘या’ चित्रपटात दिले जबरदस्त बोल्ड सीन्स

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलीवूड चित्रपट XXX मध्ये दीपिका आणि विनचे बोल्ड सीन्स खूप चर्चेत होते. या चित्रपटाच्या नंतरही दीपिकाने अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स दिले आहेत. (HBD Deepika Padukone) दीपिका पादुकोणने २०१७ मध्ये विन डीजल सोबत चित्रपट XXX: Return of Xander Cage मधून हॉलीवूड डेब्यू केला होता. ती एक अशी अभिनेत्री आहे, जिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांना मोहित केलं. दीपिका दीर्घकाळ इंडस्ट्रीमध्ये आहे आणि एकापेक्षा एक भूमिका साकारल्या आहेत. दीपिकाच्या चित्रपटांशिवाय, तिची लव्ह लाईफ, बोल्ड लुक्स आणि वादग्रस्त गोष्टींमुळेही चर्चेत राहिली. दीपिकाने हॉलीवूडमध्ये केवळ एका चित्रपट केला. (HBD Deepika Padukone)

XXX एक ॲक्शन चित्रपट होता. या चित्रपटामध्ये दीपिकाच्या बोल्ड सीन्स सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. XXX शिवाय अनेक चित्रपटांमध्ये दीपिका आपल्या बोल्ड सीन्स आणि लुक्समुळे चर्चेत होती. दीपिकाच्या हॉट सीन्सची खूप चर्चा झाली होती. तिचे बोल्ड सीन्स सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. अनेक मुलाखतीत दीपिकाचे विनसोबत केमिस्ट्री आणि रिलेशन विषयी विचारण्यात देखील आले होते.

Fighter

हा चित्रपट रिलीज होण्याआधीच चर्चेत होता. चित्रपटाचे टीजर आणि एक गाणे रिलीज झाले आहे. ऋतिकसोबत दीपिकाची धमाकेदार केमिस्ट्री चर्चेत आहे. चित्रपटात दोघांचे अनेक बोल्ड सीन्स देखील आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी रिलीज होणार आहे.

deepika

Gehraiyaan

चित्रपट Gehraiyaan मध्ये दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदीच्या बोल्ड सीन्सदेखील खूप व्हायरल झाले. दोघांचे लिप लॉक सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

Ramleela

चित्रपट गोलियों की रासलीला-रामलीलामध्ये दीपिका पती रणबीर सिंहसोबत बोल्ड सीन्स देताना दिसली होती. त्यावेळी दोघेही लग्नबंधनात अडकले नव्हते. ते केवळ रिलेशनशीपमध्ये होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT