Latest

हनुमान जन्मस्थळ वाद : नाशिकरोडला आज धर्मसंसद, काय निघणार तोडगा ?

गणेश सोनवणे

नाशिकरोड : रामभक्त हनुमान यांच्या जन्मस्थळावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.31) नाशिकरोड येथील महर्षी पंचायतन सिद्धपीठम आश्रमात सकाळी अकरा वाजता धर्मसंसदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महंत श्री स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांनी दिली.

किष्किंधा (कर्नाटक) येथील गोविंदानंद सरस्वती यांच्या प्रमुख उपस्थितीत ही धर्मसंसद होईल. गोविंदानंद सरस्वती यांनीच काही दिवसांपूर्वी नाशिक येथील अंजेनेरी पर्वत येथे हनुमानाचे जन्मस्थान नसल्याचे म्हटले होते. तर त्यांनी कर्नाटक येथील किष्किंधा येथे हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा केला होता. त्यामुळे नाशिक येथील साधू, महंत तसेच हनुमान भक्तांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील गोविंदानंद सरस्वती यांच्या दाव्याचा विरोध केला आहे.

माझ्यावरील तक्रार संकुचित बुद्धीचे लक्षण : गोविंदानंद सरस्वती
त्र्यंबकला पाच दिवस होतो, पण त्यावेळी कोणीही विरोध केला नाही. ज्याच्याकडे माझा रथ गेला नाही त्यांना वाईट वाटले. त्यांनीच माझ्याविरोधात पोलिस तक्रार करण्याचा इशारा दिला, अशी माहिती हनुमान जन्मस्थळावरून वादग्रस्त विरोध करणारे गोविंदानंद सरस्वती यांनी दिली. नाशिकरोड येथे मंगळवारी होणार्‍या धर्मसंसदेसाठी ते नाशिक येथे आले आहेत. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. हनुमान जन्मस्थळ वादाबद्दल ते म्हणाले की, हनुमान यांच्या ठिकाणावरून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यावरून एकमत व्हावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. या धर्मसंसदेचा तोच उद्देश आहे. हा प्रश्न सर्वांच्या सहमतीने मिटावावा, असे आमचे म्हणणे असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT