Latest

HAL : HAL ने कमावला 26,500 कोटींचा विक्रमी महसूल; PM मोदींनी केले कौतुक

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : HAL (Hindustan Aronautics Limited), ने गेल्या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वात विक्रमी महसूल कमावला आहे. 2022-23 या वर्षात HAL ने तब्बल 26,500 कोटी रुपये इतका विक्रमी महसूल कमावाला आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून HAL चे कौतुक केले आहे.

HAL ने ट्विट करून याबाबतची माहिती दिली. HAL च्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की,"HAL ने वेगवेगळ्या ऑपरेशन्समधून आर्थिक वर्ष 2022-23 साठी सुमारे 26,500 कोटी रुपयांचा (तात्पुरते आणि लेखापरीक्षण न केलेले) आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल नोंदविला आहे. जो मागील आर्थिक वर्षासाठी रु. 24,620 होता. कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात 8% ची महसूल वाढ नोंदवली आहे.
'विलक्षण'! मी मी HAL च्या संपूर्ण टीमचे त्यांच्या उल्लेखनीय आवेश आणि उत्कटतेबद्दल कौतुक करतो, असे ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी HALचे कौतुक केले आहे. तसेच त्यांना प्रोत्साहित देखील केले आहे.

HAL हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड

हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड ही भारतातील विमान, हेलिकॉफ्टर, इंजिन आणि संबंधित यंत्रणा जसे की एव्हिओनिक्स, उपकरणे, आणि उपकरणांची रचना, विकास, निर्मिती, दुरुस्ती आणि दुरुस्तीचा व्यवसायातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विमानांची निर्मिती केली आहे. सुरुवातीला विदेशी विमानांचे डिझाइन भारतात निर्माण करण्याचे काम कंपनी करत असे. मात्र, नंतर कंपनीने स्वदेशी डिझाइनचे विमान, हेलिकॉप्टर यांची देखील निर्मिती केली.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT