Latest

Fake Docter In Pune : हेअर ट्रान्सप्लांट करणार्‍या तोतया डॉक्टरसह तिघे अटकेत

backup backup

पुणे : पुढारी वृत्तसेवा

हेअर ट्रान्सप्लांट करून नागरिकांची मागील तीन वर्षापासून फसवणूक करणार्‍या तोतया डॉक्टरसह तिघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. कोणत्याही प्रकारची पदवी नसताना नागरिकांना वैद्यकीय व्यवसायिक असल्याची बतावणी करत हे त्रिकूट हा उद्योग करत होते. गेल्या तीन वर्षात त्याने 300 पेक्षा अधिक नागरिकांवर केश प्रत्यारोपण केल्याचे आढळून आले आहे. (Fake Docter In Pune)

तोतया डॉक्टर शाहरुख ऊर्फ समीर हैदर शाह (वय 24, रा. गणेशनगर, वडगाव शेरी), परिचारिका म्हणून काम करणारी महिला पंचशिला काशिनाथ रोडगे (वय.30,रा. वडगावशेरी) व चैताली भरत म्हस्के (वय.30,रा. वडगावशेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

चैताली ही सोशल मडियीसह इतर ठिकाणी जाहिरात करून ग्राहक मिळविण्याचे काम करत होती. याप्रकरणी महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा गलांडे यांनी विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात असलेल्या डॉ. हेअर मॅजिका हेअर ट्रान्सप्लांट अँड अ‍ॅस्थेटिक स्टुडिओ वर कारवाई करुन तोतया डॉक्टरसह तिघांना अटक केली. न्यायालयाने तिघांना आठ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख शाह याने गेल्या 3 वर्षांपासून हे हेअर ट्रान्सप्लांट क्लिनीक सुरु केले होते. तो हेअर ट्रान्सप्लांटसाठी प्रत्येकाकडून 25 ते 30 हजार रुपये घेत असे. त्याच्याविषयी तक्रारी आल्यानंतर महापालिकेकडून त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने केवळ बीएस्सी पर्यंत शिक्षण घेतले असल्याचे समोर आले. त्याच्याकडे हेअर ट्रान्सप्लांट विषयी कोणतीही पदवी नसल्याने आढळून आल्याने महापालिकेने त्याच्यावर हि कारवाई केली. त्याने क्लिनिकमध्ये ठेवलेल्या दोन महिलांना संबंधीत व्यवसायाचे कोणतेही शिक्षण नसताना त्यांच्याकडून परिचारिका म्हणून काम करुन घेतले जात होते. (Fake Docter In Pune)

याबाबत डॉ. रेखा गलांडे यांनी सांगितले की, कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर असेल तर त्याची नोंदणी महापालिकेकडे करणे बंधनकारक आहे. शाह याने अशी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्याच्याविषयी गुन्हे शाखेकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार विमानतळ येथील शाह याच्या क्लिनिकवर शुक्रवारी अचानक छापा घालण्यात आला.

त्यावेळी त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी आढळून आली नाही. त्याच्याकडे कामाला ठेवलेल्या दोन महिलांनाही आवश्यक असे कोणतेही प्रशिक्षण नव्हते. तो वैद्यकीय व्यावसायिक असल्याचे सांगून लोकांच्या जीवाशी खेळत होता. त्याच्याकडील रेकॉर्डची तपासणी केल्यावर त्याने आतापर्यंत अशा 300 हून अधिक हेअर ट्रिटमेंट केल्याचे आढळून आले असून त्याचे बहुतांश रोख पैसे घेण्यात आल्याचे दिसून आले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शोभा क्षिरसागर करीत आहेत. (Fake Docter In Pune)

ज्ञान नसतानाही लोकांना दिली जात होती भुल

आरोपी महिला पंचशिला रोडगे ही पुर्वी शहरातील एका हेअर ट्रान्सप्लांट करणार्‍या डॉक्टरकड़े काम करत होती. त्यामुळे तिला याबाबत थोडीफार माहिती होती. त्यातूनच तिने तोतया डॉक्टरच्या मदतीने हा प्रयोग करत होती. कोणत्याही प्रकारचे भुल देण्याचे ज्ञान नसताना देखील पंचशिला हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी आलेल्या लोकांना भुल देत होती.

महापालिकेडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या तोतया डॉक्टरसह तिघांना अटक करण्यात आली आहे. वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही परवाना नसताना तीन वर्षापासून ते हा उद्योग करत होते. न्यायालयाने आठ तारखेपऱ्यंत आरोपींना पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील तपास सुरू आहे.

– शोभा क्षिरसागर, सहायक पोलिस निरीक्षक विमानतळ

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT