Latest

Gujrat Assembly Election : गुजरात निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Gujrat Assembly Election : गुजरात निवडणुकीसाठी आज गुरुवारी (दि. 1) पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात आज 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी मतदान होत आहे.दरम्यान, निवडणूक आयोगाकडून यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली असून यासाठीचे मॉक वोटिंग चाचणी देखील घेण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

Gujrat Assembly Election : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यात एकूण 2 कोटी 39 लाख 76 हजार 760 मतदार मतदान करून 788 उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद करतील. 89 जागांसाठी 788 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यापैकी 70 महिला उमेदवार आहेत.

Gujrat Assembly Election : गुजरात विधानसभेत एकूण 182 जागा आहेत. त्यापैकी 89 जागांसाठी पहिल्या टप्प्प्यातील मतदान आज पार पडणार आहे. गुजरातची निवडणूक यंदा तिरंगी होणार आहे. भाजप, काँग्रेस, आणि आप मध्ये ही निवडणूक रंगणार असून पहिल्या टप्प्ट्यातील या सर्व 89 जागांसाठी भाजप आणि काँग्रेस ने उमेदवार उभे केले आहे. तर आम आदमी पक्षाने 88 जागांसाठी उमेदवार दिले आहेत. त्यामुळे ही तिरंगी लढत चांगलीच रंगणार आहे. उर्वरीत 93 जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार असून 8 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT