Latest

Gujarat Riots Cases : तिस्ता सेटलवाड यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : गुजरात दंगल प्रकरणात (Gujarat Riots Cases) गंभीर आरोप झालेल्या तिस्ता सेटलवाड (Teesta Setalvad) यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. त्यांच्या जामीन अर्जावर आता गुरुवारी सुनावणी होणार आहे.

गुजरात दंगलीशी (Gujarat riots cases) संबंधित पुरावे खोटे आल्याचे सिध्द करण्याच्या सेटलवाड यांच्या प्रयत्नाबाबत दाखल असलेले खटले केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आधारित आहेत असे नाही तर आधीपासून त्यांच्याविरोधात असलेल्या पुराव्यानुसार हे खटले दाखल करण्यात आले आहेत, असे गुजरात सरकारने एका प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. विशेष म्हणजे दंगलीनंतर गुजरातमधील तत्कालीन मोदी सरकार पाडण्याचा प्रयत्न सेटलवाड यांनी केला होता, असा आरोपही झालेला आहे.

SCROLL FOR NEXT