Latest

Vicky Kaushal : सलमानचा काय तो ॲटीट्यूड! आयफामध्ये बॉडीगार्ड्सनीही विक्कीला मारला धक्का (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपरस्टार सलमान खान सध्या आयफा २०२३ साठी आबू धाबीमध्ये आहे. (Vicky Kaushal) त्याच्याशिवाय फराह खान, राजकुमार, अभिषेक बच्चन आणि विक्की कौशलदेखील सोहळ्यासाठी पोहोचले. जे या ग्रँड इवेंटला होस्ट करणार आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये सलमान खान आणि विक्कीदेखील दिसत आहेत. व्हिडिओला पाहिल्यानंतर लोकांनी सलमान खानला ट्रोल करणे सुरु केले. वाचा काय घडलं- (Vicky Kaushal)

विक्की कौशल आपल्या फॅन्ससोबत सेल्फी घातना दिसत आहे. त्याचवेळी एक गर्दी समोरून येते. सलमान खान आपल्या बॉडीगार्ड्ससोबत एन्ट्री घेतो. सलमान खान हळू-हळू जवळ येताच, विक्की हात मिळवण्यासाठी पुढे येतो. पण सलमान खानच्या बॉडीगार्ड्स पैकी एकाने विक्कीला दूर ढकलले. त्याचवेळी स्वत: सलमान खानदेखील हात मिळवण्यासाठी पुढे येत नाही. फक्त एक लुक देत पुढे निघून जातो.

त्याचवेळी विक्की काही तरी बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी सलमान त्याचे म्हणणे ऐकून न घेता पुढे निघून जातो. व्हिडिओ पाहून लोकांचे म्हणणे आहे की, सलमान विक्की कौशलला ओळखू शकला नाही आणि तो पुढे निघून गेला. तर काहींना सलमान खानचा ॲटिट्यूड अजिबात आवडला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT