Latest

GST Collection : एप्रिल 2023 मध्ये जीएसटीचे रेकॉर्ड ब्रेक संकलन, 1.87 लाख कोटी रुपये तिजोरीत जमा

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : GST Collection : एप्रिल 2023 मध्ये जीएसटीचे (वस्तू आणि सेवा कर) संकलन 1.87 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. वित्त मंत्रालयाकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात 1.87 लाख कोटी रुपये इतके जीएसटी संकलन झाले आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक राशी आहे.

वित्त मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी मार्च 2023 मध्ये 1, 60, 122 कोटी रुपये इतक्या रुपयांचे संकलन झाले होते. गेल्या वर्षी एप्रिल 2022 मध्ये जीएसटी कलेक्शन, 1,67,540 कोटी रुपये इतके होते. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जीएसटी संकलनात 19,495 कोटी रुपयांनी वाढले आहे. ही वाढ जवळपास 12 टक्के इतकी आहे.

एप्रिल 2023 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1,87,035 कोटी रुपये इतके झाले आहे. यामध्ये केंद्रीय जीएसटी म्हणजेच सीजीएसटीचा 38440 कोटी इतका वाटा आहे. तर राज्य जीएसटी म्हणजेच (एसजीएसटी) 47,412 कोटी असून एकीकृत जीएसटी (आयजीएटी) चा वाटा 89,158 कोटी रुपये इतका आहे. उपकरात 12025 कोटी रुपयाचे योगदान राहिले आहे. तर आयजीएसटीमध्ये वस्तुंच्या आयातीवर लागलेला कर 34972 कोटी रुपये इतका राहिला आहे.

20 एप्रिल 2023 ला सर्वाधिक जीएसटी संकलन

वित्त मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार एका दिवसात सर्वाधिक जीएसटी संकलन 20 एप्रिल 2023 ला झाला आहे. यादिवशी 9.8 लाख देवाण-घेवाणीच्या माध्यमातून एकूण 68,228 कोटी रुपयांचे संकलन झाले आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT